computer

आता अवकाशात पण टाईडची सफेदी? नासाने टाईड सोबत हातमिळवणी का केली आहे?

दरवर्षी कित्येक वैज्ञानिकांना नासा अंतराळात पाठवत असते. या वैज्ञानिकांचा अवकाश दौरा हा अनेक महिन्याच्या असतो. काहीवेळा तर तो काही वर्षे देखील चालत असतो. या काळात त्यांच्या खाण्यापासून तर प्रसाधनापर्यंत गोष्टींची काय सोय केली जाते याबद्दल बऱ्याचवेळा चर्चा होते. यातच एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो ,तो म्हणजे एवढे दिवस आकाशात काढायचे म्हटल्यावर त्यांना किती कपडे घेऊन जावे लागत असतील? तिकडे त्यांच्या कपड्यांच्या स्वच्छतेचे काय केले जाते? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? चला तर याच विषयावर काही माहिती जाणून घेऊया.

वैज्ञानिक आपल्या अंडरपंट्स आणि इतर कपडे खराब झाल्यावर फेकून देतात. आकाशात जमा होणारा कचरा याबद्दल तुम्ही ऐकले/ वाचले असेल. त्या कचऱ्यात कपड्यांचा पण समावेश होत असतो. आता यात बदल करण्यासाठी नासाने एक वेगळी डोक्यालिटी लढवली आहे. 

नासाने टाईड या धुणे पॉवडरच्या कंपनी सोबत एक करार करायचे ठरवले आहे. वैज्ञानिकांना इतर साहित्यासोबत टाईड पॉवडर दिली जाणार आहे. म्हणजे एकार्थी वैज्ञानिकांना घरी तर घरी अवकाशात पण कपडेच धुवावे लागणार आहेत. आकाशात पसरणारा कचरा आणि कपड्यांवर होणारा भरमसाठ खर्च टाळण्यासाठी ही भन्नाट आयडिया नासाकडून करण्यात आली आहे. 

टाईड आता अशा अवकाश मोहिमांसाठी विना पाणी किंवा अतिशय कमी पाण्यात कपडे धुता येतील असे डिटर्जंट पावडर तयार करणार आहे. तसेच कपडे धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी परत फिल्टर करून पिण्यासाठी किंवा स्वाईन बनविण्यासाठी वापरता येईल, याचाही विचार केला जाणार आहे. हा पहिला प्रयोग पुढील वर्षी कार्गो फ्लाईटमध्ये करण्यात येणार आहे. या पूर्वी करण्यात येणाऱ्या चाचणीत डिटर्जंटवर मायक्रो ग्रॅविटी (अत्यंत कमी गुरुत्वाकर्षण) आणि रेडिएशनचा (किरणोत्सर्ग) काय परिणाम होतो हे तपासले जाणार आहे आणि मगच ते वापरले जाईल.

या वेगळ्या प्रयोगामुळे नासाचा मोठा खर्च वाचू शकेल, तसेच अवकाशातल्या कचऱ्याचा पण प्रश्न काही प्रमाणात मिटू शकणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required