computer

चला तुमच्या शास्त्राच्या ज्ञानाची परीक्षा घेऊया....या ११ प्रश्नांची अचूक उत्तरे द्या !!

थोड्याच दिवसात मुलांच्या शाळा सुरु होतील आणि पालक हुश्श म्हणत सुस्कारा टाकतील. काही शाळा ऑनलाइन सुरु आहेत. पण मुलं शाळेत गेल्याशिवाय आईवडिलांना चैन पडत नाही. मग चाचणी परीक्षा- त्यांना आता युनिट टेस्ट म्हणतात म्हणे- त्या सुरु होतील. प्रोजेक्ट सुरु झाले की कागद, रंग, दगडं, काचा, असं ढीगभर सामान आणण्यासाठी पालकांची धावपळ सुरु होईल. हे झालं की शाळा सुरु झाल्याची खात्री पटेलच. नंतर विषय सुरु होईल गृहपाठाचा. म्हणून आज आम्हीच तुम्हाला थोडे प्रश्न विचारून तुमचं शास्त्राचं ज्ञान अजमावून बघणार आहोत. बघा या अकरा प्रश्नांपैकी कितीं प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात ते! तुमच्या मुलांची मदत घ्यायला आमची काहीच हरकत नाही. तसेही आम्ही लेखाच्या तळाला उत्तरे दिली आहेतच.

१ )आपण मोबाइलवर संभाषण करताना कोणत्या लहरींचा वापर करतो?

१. रेडिओ लहरी
२. ध्वनी लहरी
३. प्रकाश लहरी

२) प्रकाशवर्ष या परिमाणात काय मोजले जाते ?

१. वेळ
२. अंतर
३. रेडिओ फ्रिक्वेन्सी

३) हृदयाकडून शरीराच्या इतर भागांत रक्त पुरवठा करणार्‍या रक्त वाहिन्यांना काय म्हणतात?

१. व्हेन
२. आर्टरी
३. कॅपिलरी

४) कोणत्याही पदार्थाच्या कोणत्या रुपात त्याचे कण एकमेकांना अधिक जवळ आणि घट्ट धरून असतात?

१. घन
२. द्रव
३. वायू
४. प्लाझ्मा

५) यापैकी कोणता प्राण्यांच्या पेशींचा भाग नाही?

१. मायटोकाँड्रीया
२. सायटोप्लाझम सेल
३. सेल वॉल

६) वातावरणाच्या कोणत्या थरातून विमाने प्रवास करतात?

१. स्ट्रॅटोस्फीअर
२. ट्रोपोस्फीअर
३. मेसोस्फीअर

७) यापैकी कोणता वायू 'नोबल गॅस' आहे?

१. ऑक्सिजन
२. फ्लोरीन
३. क्रिप्टॉन

८) एखाद्या पदार्थाची घनता शोधण्यासाठी कशाची आवश्यकता असते?

१. वस्तूमान
२. आकारमान
३. दोन्ही

९) यापैकी कोणता आपल्या पचनसंस्थेचा भाग नाही?

१. अन्ननलिका
२. घसा
३. मोठे आतडे

१०) काय मोजण्यासाठी या यंत्राचा म्हणजे बॅरोमीटरचा वापर केला जातो?

१. हवेचा दाब
२. रक्तातली साखर
३. समुद्र सपाटीपासून उंची

११)शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करणार्‍या प्राण्यांना काय म्हणतात?

१. ओम्नीव्होरस
२. कार्नीव्होरस
३. हर्बीव्होरस

१ ) आपण मोबाइलवर संभाषण करताना कोणत्या लहरींचा वापर करतो?
१. रेडिओ लहरी 

२) प्रकाशवर्ष या परिमाणात काय मोजले जाते ?
२. अंतर 

३) हृदयाकडून शरीराच्या इतर भागांत रक्त पुरवठा करणार्‍या रक्त वाहिन्यांना काय म्हणतात?
२. आर्टरी  

४) कोणत्याही पदार्थाच्या कोणत्या रुपात त्याचे कण एकमेकांना अधिक जवळ आणि घट्ट धरून असतात?
१. घन 

५) यापैकी कोणता प्राण्यांच्या पेशींचा भाग नाही?
३. सेल वॉल 

६) वातावरणाच्या कोणत्या थरातून विमाने प्रवास करतात?
१. स्ट्रॅटोस्फीअर

७) यापैकी कोणता वायू 'नोबल गॅस' आहे?
३. क्रिप्टॉन

८) एखाद्या पदार्थाची घनता शोधण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
३. दोन्ही 

९) यापैकी कोणता आपल्या पचनसंस्थेचा भाग नाही?
२. घसा  

१०) काय मोजण्यासाठी या यंत्राचा म्हणजे बॅरोमीटरचा वापर केला जातो?
१. हवेचा दाब 

११) शाकाहार आणि मांसाहार दोम्ही करणार्‍या प्राण्यांना काय म्हणतात?
१. ओम्नीव्होरस

आज फक्त ११च प्रश्न. यानंतर असाच प्रश्नसंच इतिहासाचा करू या! काय म्हणता?

सबस्क्राईब करा

* indicates required