computer

१७०० किलोचा दगड त्यांनी चक्क हातानी हलवला....हे भन्नाट तंत्रज्ञान कुठून आलंय पाहा !!

इजिप्तचे पिरॅमिड्स, भारतातली भव्य मंदिरे, सुमारे ५००० वर्षांहूनही जुनं स्टोनहेंज, ईस्टर आयलंडवरील पुतळे अशा कित्येक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांच्यामध्ये एकच एक समान धागा आहे. या वास्तू बनवण्यासाठी जे दगड लागले त्यांना मूळ खाणीतून कसं वाहून आणण्यात आलं याचं गूढ आजवर उकलेलं नाही. हा प्रश्न या वास्तू पाहिल्यावर पडतो. हे दगड हजारो किलोग्रामचे आहेत. त्यावेळचं तंत्रज्ञान आज सारखं प्रगतही नव्हतं. मग हे शक्य कसं झालं ?

मंडळी, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) ने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. MIT च्या इंजिनियर्सनी खास डिझाईन केलेले, १७०० किलोग्रम्सचे कॉंक्रीटचे ठोकळे तयार केले आहेत. या ठोकळ्यांना  massive masonry units (MMUs) म्हणतात. या ठोकळ्यांची खासियत म्हणजे त्यांना कोणीही हातांनी सहज एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकतं. हा व्हिडीओ पाहा.

मंडळी, आता समजलं हे ठोकळे काम कसं करतात ? आपण विज्ञानात टेकू आणि तरफेचे नियम वाचलेच असतील. आर्किमिडीज तर म्हणाला होता की मला योग्य टेकू मिळाला तर मी पृथ्वी पण इकडची तिकडे करून दाखवेन. याच नियमाला धरून MITच्या इंजिनियर्सनी हे ठोकळे तयार केलेत.

तसे हे ठोकळे नसून मोठाले पझल्स आहेत. यांना जोडून एक मोठी वास्तू तयार करता येते. हवं तेव्हा त्यांना वेगळंही करता येतं. हे डिझाईन त्या पुरातन वास्तुकलेचं रहस्य आहे राव. आपण विचार करतो की पुरातन काळात लोकांनी दगड वाहून कसे आणले असतील, पण खरी गोष्ट तर अशी आहे, की त्यासाठी त्यांनी केवळ विज्ञानाची मदत घेतली होती.

तर मंडळी, हे होतं इतिहासातील एका न उलगडलेल्या प्रश्नाचं उत्तर. याच प्रकारे इजिप्तचे पिरॅमिड्स तयार करण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरलं होतं याचंही उत्तर मिळालं आहे. हा लेख वाचा.

पिरॅमिड्स बांधायला ६० लाख टन दगड आणले तरी कसे ? विज्ञानाने उलगडलय रहस्य !!