बंगाली वाघांपेक्षा मोठं मांजर सापडलं

दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना हा देश प्राचीन जीवाश्मांचा एक खजिना आपल्या अंगाखांद्यावर बाळगून आहे.  त्यामुळे प्राचीन आणि आता लयाला चालले्ल्या जीवसृष्टीचा अभ्यास करणारे पॅलिएन्टॉलॉजिस्ट तिथे वारंवार भेट देत असतात. नुकत्याच पार पडलेल्या अशा मोहिमेतून एक नवीनच बातमी जगाला कळली आहे. अर्जेंटिनामध्ये  तलवारीसारखे  दात असलेल्या मांजरांच्या पावलांचे जीवाश्म सापडल्याचं नुकतेच जाहीर करण्यात आलंय.

अर्जेंटिनामधल्या मीरामार नावाच्या समुद्र किनार्‍यावर खळाळत्या लाटांच्या जवळपासच्या खडकाळ जागी हे पावलांचे ठसे आढळून आले आहेत. शेवटच्या जागतिक हिमयुगाच्या वेळी इथला सध्याच्या किनारपट्टीचा भाग या जागेपासून बराच दूर होता. त्यामुळे इथे या तलवारीसारखे दात असलेल्या मांजरांचा वावर आसावा असे मानलं जात आहे. या ठशांचे वैशिष्ठ्य असे की याचा आकार मार्जार कुलातील सध्याच्या सर्वात मोठ्या आकाराच्या बंगाली वाघापेक्षाही मोठा आहे. यातला एक ठसा सुमारे १९.२ सेंमी म्हणजे संपूर्ण वाढ झालेल्या आणि पसरलेल्या मानवी पंज्याहूनही मोठा आहे. 

 

जीवशास्त्राच्या अभ्यासातील परंपरेनुसार सापडलेल्या जीवाश्माला नेमक्या कोणत्या स्पिशीबरोबर जोडायचे याबद्दल गोंधळ असल्याने या प्राण्याला Smilodonichnum miramarensis अर्थात मीरामारचा पाऊलखुणा करणारा स्मिलोडोन असे नाव देण्यात आले आहे. या मांजराचं कुल ठरेल तेव्हा ठरेल. पण ही वाघाची मावशी प्राचीन काळी त्याच्यापेक्षा बरीच मोठी होती असं दिसतंय. 

 

स्त्रोत

सबस्क्राईब करा

* indicates required