आणि बुद्ध हसला.. जाणून घ्या भारताच्या पहिल्या यशस्वी अणूचाचणीविषयी काही गोष्टी..

१८ मे १९७४ रोजी भारताने पहिली अणुबॉंब चाचणी केली.  साहजिकच या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती आणि काही मोजक्याच लोकांना याची माहिती होती.

राजस्थानातल्या पोखरण इथं ही चाचणी घेण्यात आली. तिचं सांकेतिक नांव होतं-स्मायलिंग बुद्धा.. म्हणजेच, बुद्ध हसला.  या चाचणीनंतर पोखरण इथं आणखीही काही चाचण्या घेण्यात आल्या आणि ११मे १९९८रोजी पोखरण-२ अंतर्गत ’शक्ती’ या अणुबॉंबची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 

 
The Smiling Buddha Operation that drew flak in 1974

On this day in 1974, India conducted its first nuclear test in Pokhran.

Posted by Scroll on Wednesday, May 18, 2016

जाणून घेऊयात या प्रकल्पाबाबत काही गोष्टी:-

-या प्रकल्पाचे नांव होतं- ’स्मायलिंग बुद्धा’

 -हा अणुस्फोट राजस्थानातल्या थरच्या वाळवंटातल्या ’पोखरण’ इथल्या लष्करी गोळीबारासाठी असलेल्या मैदानामध्ये (Army range) घडवण्यात आला. म्हणून या चाचणीला पोखरण-१ असंही म्हणतात.

-युनोच्या कायमस्वरूपी सभासद असलेल्या पाच देशांव्यतिरिक्त इतर देशानं अशी चाचणी अधिकृतरित्या जाहिर करण्याची ही पहिलीच वेळ होती.

-या वेळेपावेतो भारत युनोचा सदस्य नसल्यामुळं भारतावर तेव्हा खूप टीका झाली होती. 

-भारताने त्याचा अणुसंबंधी कार्यक्रम १९४४ मध्येच डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेच्या अंतर्गत चालू केला होता.

-भारत-पाकिस्तानच्या १९७१युद्धापर्यंत आण्विक शस्त्र कार्यक्रमास भारतानं तितकं महत्व दिलं नव्हतं. 

-या युद्धात आपल्याकडं असे आण्विक बॉंब जवळ असणं  किती फायद्याचं आहे हे दाखवून दिलं. या युद्धादरम्यान डिसेंबर १९७१ मध्ये अमेरिकेचे ३७वे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी भारतावर दबाव आणण्यासाठी बंगालच्या उपसागरात विमानवाहू नौका पाठवली. रशियानंही भारताच्या मदतीसाठी दोन युद्धनौका पाठवल्या आणि एकप्रकारे अमेरिकेला  भारताविरूद्ध अण्वस्त्रे वापरण्यापासून थांबवलं.  याप्रकारानंतर भारताला अण्वस्त्रं जवळ असणे महत्वाचे झाले.

-७ सप्टेंबर १९७२ रोजी इंदिरा गांधींनी भाभा अणुसंशोधन केंद्रास अणूयंत्रे बनवायला आणि चाचण्या करायला मान्यता दिली.

-अमेरिकेनं जो नागासाकी वर बॉंब टाकला होता त्याचं नाव होतं- फॅटमॅन आणि  हिरोशिमावर टाकलेल्या बॉंबचं नांव होतं –लिटिल बॉय. या पोखरणमधल्या बॉंबचा आकार अमेरिकेच्या ’फॅटमॅन’ बॉंब सदृश होता आणि त्यासाठी ६किलो प्लुटोनिअम लागलं. 

-अणुचाचणीसाठी वापरलेल्या बॉंबचा व्यास १.२५मीटर तर वजन १४००किलो होतं.

-बॉंब जमीनीखाली १०७ मीटर अंतरावरती पुरण्यात आला होता आणि सकाळी ८:०५वाजता त्याचा स्फोट करण्यात आला. 

-स्फोटातून ८किलोटन टीएनटी इतकी उर्जा निर्माण झाली. नागासाकीवरती टाकण्यात आलेल्या फॅटमॅनमधून २०किलोटन उर्जा निर्माण झाली होती, यावरून या स्फोटाची तीव्रता लक्षात येते. 

सबस्क्राईब करा

* indicates required