हे आहे जगातलं सर्वात मोठं विमान, सायफाय सिनेमातल्या सारखंच.. काय काय आहे या विमानात ?

मंडळी, जगातील सर्वात मोठं विमान तयार झालं आहे. वरती फोटोत या विमानाला तुम्ही पाहू शकता. आजवर फक्त चमत्कारीत विज्ञान कथांमध्ये किंवा साय-फाय सिनेमांमध्ये अशा प्रकारचं विमान पाहण्यात आलं होतं. पण ही कल्पना आता सत्यात उतरली आहे. भविष्यात असे विमान असतील म्हणता म्हणता खरोखरच भविष्याच्या आपण जवळ पोहोचलोय.

चला तर आज जाणून घेऊया जगातील सर्वात मोठ्या विमानाच्या काही खास गोष्टी.

१. या विमानाचं नाव आहे ‘स्ट्रॅटोलाँच’. दोन भागांना एकत्र करून हे विमान तयार करण्यात आलंय. या दोन्ही भागांच्या पंखांची लांबी ही तब्बल ३८५ फुट एवढी मोठी आहे. हे अंतर चक्क फुटबॉल मैदानापेक्षा जास्त आहे राव.

स्रोत

२. ‘स्ट्रॅटोलाँच’ला तब्बल २८ चाकं असून २ कॉकपिट आणि ६ इंजिन जोडण्यात आलेत. ६ इंजिन असलेलं हे जगातलं एकमेव विमान आहे.

३. या विमानाचा वापर रॉकेट किंवा उपग्रह प्रक्षेपणासाठी करण्यात येणार आहे. त्याचं काय आहे ना, जमिनीवरून रॉकेट लाँच करणं हे खर्चिक असतं. त्यापेक्षा स्ट्रॅटोलाँचने रॉकेट सोडल्यास उड्डाणासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत होईल. या पद्धतीला ‘एअर लाँच टू ऑर्बिट’ म्हटलं जातं.

स्रोत

४. स्ट्रॅटोलाँच’चा वेग बघून छातीत धडकी बसेल राव. ८५३ किलोमीटर प्रती तासाच्या गतीने स्ट्रॅटोलाँच उडू शकतो.

५. मायक्रोसॉफ्ट आणि स्ट्रॅटोलाँचा खूप जवळचा संबंध आहे कारण मायक्रोसॉफ्टचे सहनिर्माते  पॉल एलन यांनीच स्ट्रॅटोलाँची निर्मिती केली आहे. निर्मिती त्यांची असली तरी या अचंबित करणाऱ्या डिझाईनच्या पाठी नॉर्थरॉप गृमन कॉर्पोरेशनच्या स्किल्ड कम्पोझीट या कंपनीची डोक्यालिटी आहे.

>

स्रोत

मंडळी, स्ट्रॅटोलाँच विमानाला अजून अनेक चाचण्यांमधून जावं लागणार आहे. २०१९ पर्यंत या चाचण्या पूर्ण होतील आणि अखेर तो आकाशात झेपावणार आहे. तूर्तास या अवाढव्य विमानाचा व्हिडीओ पाहून घ्या राव.

सबस्क्राईब करा

* indicates required