computer

बोभाटाची बाग भाग-६ : या सुंदर फुलाला विष्ठेच्या देवतेचे फूल का म्हणतात ??

आयुष्य आपल्या अपेक्षेप्रमाणे चालत नसतं .

आपल्याला हवं तसं वळत नसतं.

नको नकोशा गोष्टी सहन कराव्या लागतात हे फक्त आपल्यापुरतं म्हणजे माणसांच्या आयुष्यातच असतं असं नाही. ते 'नकोसे' पण अगदी वनस्पतींना पण भोगावं लागतं .

आज ज्या फुलाची ओळख आम्ही करून देणार आहोत त्याला मराठीत जंगली बदाम म्हणतात.

राजस्थानच्या एका देवळात याच्या बिया भाजून प्रसाद म्हणून देताता. 

पण या  चांदणीच्या आकाराच्या लालगुलाबी मखमली फुलाला इंग्रजीत  चक्क 'विष्ठेच्या देवतेचे फूल' म्हणतात. 

 

रोमन पौराणिक संस्कृतीत या वृक्षाचे नाव Sterquilinus किंवा Sterculius या देवतेवरून ठेवण्यात आलं आहे.

ही देवता ओडर म्हणजे घाणेरड्या वासाची देवता समजली जाते. रोमन पौराणिक असे अनेक विचित्र उल्लेख आहेत.

स्टेर्क्युलीस  ही देवता घाण वासाची , 'शि'ची देवता असेल तर 'क्रेपीटस' ही चक्क पादण्याची देवता आहे.

नवल वाटायला नको आपल्या भारतीय पुराणात पण केर ,कचरा उकिरड्याची करिशीणी नावाची देवता आहे.  

तर या प्रजातीत एकूण ९१ वेगवेगळे वृक्ष येतात. त्यापैकी काही स्टेरीक्युलीयस्च्या जाती भारतात -महाराष्ट्र -गुजरात-मद्रास- छोटा नागपूर मध्ये वाढतात.

या गोंदामुळे अनेक किटक आकर्षित होतात. किटक आले म्हनजे त्यांचे भक्षकही म्हणजे पक्षी गोळा होतात. पण पक्षांना किंवा इतर किटकांना आकर्षित करून घेतो या झाडाच्या फुलाचा वास ! 

आपल्यासाठी तो अत्यंत घाणेरडा असतो पण त्यांना तो आकर्षित करतो.

ही झाडे रस्त्याच्या बाजूने लावलेली बघाय्ला मिळतील.

जरी फुलांचा लाल गुलाबी रंगही आकर्षक दिसला तरी फुलांचा वास घ्यायचा असेल तर नाकपुडी घट्ट बंद करूनच घ्या. नाहीतर फुटक्या ड्रेनेज पाइपमधून येणार्‍या वासाचा सामना करावा लागेल

आता आजपासून आपण वनस्पतींच्या शास्त्रीय नावाची फोड करायला शिकू या ! 

या झाडाचे नाव Sterculia foetida. नावाच्या पहिल्या भागाचा अर्थ कळलाच आहे दुसरा शब्द foetida  दुर्गंधी वासासोबत जोडला आहे .

हिंगाला इंग्रजीत अ‍ॅसाफोटीडा का म्हणतात त्याचाही उलगडा आता झाला असेल.

आपण हिंग आवडीने खातो आणि त्याचा गंध आपल्याला सरावाचा आहे पण फ्रेंच बोलीभाषेत हिंगाला डेव्हील्स शीट तर इंग्रजीत डेव्हील्स डंग म्हणतात.

इतकं सगळं विवरण करण्याचं कारण असं की माणसा माणसात देखील एकच वास एकाच वेळी आवडता आणि नावडता असतो तर झाडांच्या फुलांना येणार्‍या वासाला दुर्गंध का म्हणायचं ते तुम्हीच ठरवा.

लेखिका -अंजना देवस्थळे 

सबस्क्राईब करा

* indicates required