आता करा व्हिडीयो कॉल, व्हाट्सअॅप घेउन आलय नवं फिचर..

आजकाल लोकांना व्हाट्सअॅप शिवाय जमतच नाही त्यामुळे व्हाट्सअॅप देखील आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवीन फिचर्स आणत असतं. व्हॉईस कॉल आणि फोटो एडिटिंग सुविधेनंतर आता व्हाट्सअॅपने नवीन अपडेट उपलब्ध करून दिलाय ज्यामुळे आपण आता व्हाट्सअॅप वरून व्हिडिओ कॉलींग करू शकतो. 

 ११ नोव्हेंबरला व्हाट्सअॅपचा हा नवीन अपडेट अॅन्ड्रॉईड युजर्ससाठी खुला झालाय. त्यामुळे तुम्ही आता व्हिडीओ कॉलींगच्या माध्यमातून आपल्या मित्र, नातेवाईकांशी अधिक चांगल्या पध्दतीने गप्पा मारण्याचा आनंद लुटू शकता. यासाठी तुम्हाला तुमचं सद्याचं व्हाट्सअॅप प्ले स्टोअरवरून अपडेट करून घ्यावं लागेल. सद्या फक्त अॅन्ड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध असलेलं हे फिचर थोड्या दिवसात बाकीच्या अॉपरेटींग सिस्टम्ससाठी सुद्धा उपलब्ध होईल.

 तुमच्या मोबाईलच्या नेटवर्क क्वालिटी प्रमाणे हे व्हिडीओ कॉलींगही ऑटोमॅटीक अॅडजस्ट  होईल.. चला मग करा लवकर अपग्रेड आणि लावा कॉल...

सबस्क्राईब करा

* indicates required