तुम्हाला व्हॉट्सऍप गोल्डला अपग्रेड करा असा मेसेज आलाय का? त्या मेसेजकडे ताबडतोब दुर्लक्ष करा..

सगळ्यात जास्त पॉप्युलर असलेले व्हॉट्सऍप हे लोकांना फसवण्यासाठीचे हॅकर्सचे आवडते माध्यम आहे. यावर रोज नवनवीन अफवा पसरतच असतात. गेल्या काही दिवसात असाच एक मेसेज फिरतो आहे. ह्या मेसेज मध्ये व्हॉट्सॅपच्या वापरकर्त्यांना ’व्हॉट्सऍप गोल्ड’ला फ्री अपग्रेड करण्यासाठी निमंत्रित केले आहे असे दर्शविण्यात येत आहे.

ह्या मेसेजचा मूळ मजकूर असा आहे.

 “Hey Finally Secret Whatsapp golden version has been leaked, This version is used only by big celebrities.”Now we can use it too ,WhatsApp Gold Contains many advanced features like WhatsApp Video calling , Delete the messages you sent by mistake , Send more than 100 pics at once ,Free calling ,Change WhatsApp themes and tons of great features. This WhatsApp gold can be activated only Via Invites and I am inviting you. Once you activate this WhatsApp gold , your green icon will change to gold and you can enjoy all features 100% safely. Activate WhatsApp Gold with one click at https://www.goldenversion.com/”

 

पण तुम्ही या मेसेजकडे दुर्लक्ष करावे आणि ह्या लिंकवर क्लिक करणे टाळावे.  ’व्हॉट्सऍप’कडून अधिकृतरित्या अशी कोणतीही आवृत्ती काढण्यात आलेली नाही. या लिंकवर क्लिक केल्यास ’404’ म्हणजेच ’पान सापडले नाही’ असा एररमेसेज येतो. जालावर असणाऱ्या अशा लबाड अफवांपासून वाचण्यासाठी अनोळखी लिंक्सवर क्लिक करणे शक्यतो  टाळावेच.

सबस्क्राईब करा

* indicates required