तुम्ही तुमच्या स्वतःच्या पांढऱ्या रक्तपेशी उघड्या डोळ्यांनी पाह्यल्या आहेत.. विश्वास नाही बसत ? मग हे वाचाच...

राव, तुम्ही आकाशाकडे जेव्हा जास्त वेळ बघत राहता तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर गोल किंवा लांब जंतू नाचू लागतात. हे जंतू पांढऱ्या किंवा निळ्या रंगांचे असतात. हे तरंगणारे प्राणी बघणे म्हणजे काहींचा टाईमपास सुद्धा असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की ते नेमके कोणते जंतू असतात ? नाही ?

बरं पण हे तेच ०.१% वाले जंतू असतात का ज्यांना डेटॅल मारू शकत नाही ? अहो गंमत केली राव. तर, भाऊ हे जंतू वगैरे काही नसून चक्क तुमचेच पांढऱ्या रक्तपेशी असतात. पण हे पांढऱ्या रक्तपेशी आपल्या डोळ्यांसमोर कसे ? समजून घेण्यासाठी पुढे वाचा की !!

स्रोत

त्याआधी एक समजून घेतलं पाहिजे की आपल्या डोळ्यांनी आपण समोरची गोष्ट पाहू शकतो याचं कारण म्हणजे त्या गोष्टीपासून परावर्तीत होणारा प्रकाश. हा परावर्तीत होणारा प्रकाश आपल्या दृष्टीपटलावर त्या वस्तूची आकृती तयार करतो.

तर आता वळूयात आपल्या विषयाकडे. त्याचं काय आहे ना, आपल्या डोळ्यांच्या बुबुळांवरून (काळा भाग) सूक्ष्म केश वाहिन्या रक्त पाहून नेण्याचं काम करत असतात. या वाहिन्या केसापेक्षाही लहान असतात. त्यांच्यातून वाहणाऱ्या लाल रक्त पेशी ह्या सूर्यप्रकाश शोषून घेण्याचं काम करतात, तर याउलट पांढऱ्या रक्त पेशी तितकासा प्रकाश शोषून घेत नाहीत. त्यामुळे होतं असं की आपल्या डोळ्यांना त्या पांढऱ्या रक्तपेशी पांढऱ्या ठिपक्याप्रमाणे दिसतात आणि असं जाणवतं की आपल्या डोळ्यात कचरा साचला आहे किंवा आपल्याला जंतू दिसत आहेत.

स्रोत

पांढऱ्या रक्तपेशी सूर्य प्रकाश अडवत असल्याने त्यांचं प्रतिबिंब आपल्या दृष्टीपटलावर पडतं. आपल्या शरीरातील रक्ताच्या फक्त १% या पांढऱ्या रक्तपेशी असतात. तुम्ही बघितलं असेलच हे ठिपके सतत हलताना दिसतात. या सूक्ष्म रक्त वाहिन्या अत्यंत जलद गतीने रक्त वाहून नेण्याचं काम करत असल्याने आपल्याला हलणारे ठिपके दिसत असतात.

तर मंडळी, आपल्या डोळ्यांना दिसणारा हा आभास खरं तर आपल्याच शरीरातील एक महत्वाचा घटक असतो.  

सबस्क्राईब करा

* indicates required