computer

'कॅन्यूलेटेड काऊ' : दुग्धोत्पादन वाढावे म्हणून केलेला हा उपाय अघोरी आणि अमानवी म्हणायचा का ?

आपल्या जीवनात दुधाचे महत्व किती आहे, हे काय सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाला रोजच्या रोज चहा पासून तर इतर अनेक गोष्टींच्या माध्यमातून दूध लागतेच. पण मागणी तितके दुधाचे उत्पादन नाही. म्हणून दुधाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. आता दुधाचे उत्पादन वाढावे म्हणून लोक काय काय उद्योग करतात हे थोडा अभ्यास केला तर कळू शकते. आज आम्ही अशीच एक पद्धत सांगणार आहोत, ज्यावरून आपल्यापर्यंत पौष्टिक दूध पोहोचावे म्हणून गायींना काय सहन करावे लागते हे तुम्हाला समजू शकेल.

१९२८ साली, नॉर्थ डकोटा एग्रिकल्चरल कॉलेजच्या आर्थर फ्रेडरिक शाल्क आणि आरएस अमाडॉन यांनी एक प्रक्रिया विकसित केली. पचनसंस्थेमध्ये फेरफार करून दुधाचे उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग ते शोधत होते. त्यांनी शोधलेल्या प्रक्रियेला Fistulation असे म्हटले जाते. यात चक्क गायीच्या पोटात खड्डा केलेला असतो. या पद्धतीत शस्त्रक्रियेने गायीच्या पोटात मोठ्या कॅन्युलाचे म्हणजे पाईपचे रोपण केले जाते, जे काहीसे पोर्टहोल म्हणजे झाकणासारखे दिसते, ज्यामुळे पचनसंस्थेची तपासणी आणि विश्लेषण करण्यासाठी गायीच्या रुमेनमध्ये प्रवेश करता येतो.

या प्रक्रिया केलेल्या गायीला "फिस्ट्युलेटेड गाय" किंवा कॅन्युलेटेड गाय देखील म्हणतात. या प्रकारे पशुवैद्य एका गायीच्या रुअमेनमधू  दुस-या गायीच्या रुमेनमध्ये जैविक पदार्थ प्रत्यारोपण करतात. पण हे सगळे कशासाठी ? तर यातून जास्तीतजास्त दुग्धोत्पादन होण्यासाठी  गायीला कुठले अन्न योग्य आणि त्याचे प्रमाण या गोष्टींचा अभ्यास केला जातो.

आज  जवळजवळ एक शतकानंतर ही प्रक्रिया अजूनही वापरली जाते आणि अजूनही खूप विवादास्पद आहे. आपल्याला माहित आहे की, गायीच्या पोटाचे चार भाग असतात ज्यांची नावं अशी आहेत.  रुमेन -रेटीक्युलम-ओमॅसम आणि सब ओमॅसम(आकृती पहा) परंतु पचनाचे मुख्य कार्य मुख्यतः रुमेनमध्ये होते. येथे, असंख्य सूक्ष्मजीव वनस्पती सेल्युलोजचे उर्जेमध्ये रूपांतर करतात. या सूक्ष्मजीवांची रुमेनमधील वस्ती म्हणजे दोन जीवांचे नैसर्गिक सबंध म्हणायला हरकत नाही.जनावराच्या आतड्याच्या आरोग्याची काळजी हे सूक्ष्मजीवांचे कार्य आहे. (आपल्या आतड्यातही असेच सूक्ष्म्जंतू असतात)


कॅन्युलेटेड गाईमध्ये, आजारी गायींवर उपचार करण्यासाठी रुमेन बॅक्टेरिया मिळविण्यासाठी शरीराच्या बाजूला एक . एक मजबूत कॅन्युला किंवा ट्यूब ओपनिंगमध्ये घातली जाते आणि त्यावर झाकण लावले जाते. निरोगी गायीच्या शरीरातून सूक्ष्मजंतू काढण्यासाठी ही पद्धत  वापरली जाते.थोडक्यात चक्क एक बोगदा तयार केला जातो.या बोगद्याचा वापर करून रुमेन मधील पाचकरस आणि सूक्ष्मजंतू बाहेर काढले जातात आणि नंतर आजारी गायीच्या शरीरात सोडले जातात.याला ट्रान्सफॉनेशन म्हणतात. अशाप्रकारे, कॅन्युलेटेड निरोगी गाय दाता बनते आणि आजारी गायीला  त्यांच्या संतानप्राप्तीसाठी निरोगी बॅक्टेरिया प्रदान करते.

सशक्त आणि निरोगी गायीच्या पोटात अशाप्रकारे ट्यूब टाकण्यासाठी शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. ज्या प्रक्रियेमध्ये प्रवेश ठेवला जातो ती जागा ऍनेस्थेसियाद्वारे बधीर केली जाते. ही प्रक्रिया केल्याच्या सहा आठवड्यांनंतर कॅन्यूला जागेवर बसतो . जखमा भरून येतात.

अनेक प्राणीप्रेमी संस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी सर्व देशांमध्ये या प्रक्रियेविरुद्ध आवाज उठवला आहे. याऊलट,समर्थकांचे म्हणणे आहे की यामुळे अनेक गायींना १२ ते १५ वर्षे निरोगी जीवन जगण्यास मदत झाली आहे. उपचार केलेल्या प्राण्यांचे आयुर्मान वाढते आणि रक्तसंक्रमणामुळे मरणासन्न आणि आजारी प्राणी पुन्हा फिट होण्यास मदत होते.

याशिवाय, गाईच्या पोटात धोकादायक जीवाणू त्या कृत्रिम छिद्राद्वारे प्रवेश करू शकतात अशी भीती प्राणीप्रेमींकडून व्यक्त केली गेली आहे. तर डॉक्टर आणि जीवशास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की गायीमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेल्या सर्व चांगल्या जीवाणूंमुळे संभाव्य हानिकारक जीवाणू प्रभावीपणे थांबतात.

तुलना केल्यास कॅन्युलेटेड गायी बहुतेक वेळा कळपातील सर्वात निरोगी असतात. सध्या कॅन्युलेशन  जगभरात वापरले जात आहे. युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा दूध उत्पादक फ्रान्स या देशात हरितगृह वायूंचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि अन्न उत्पादन सुधारण्यासाठी गायींच्या पोटाची तपासणी केली जात आहे, असे शेतकरी आणि शास्त्रज्ञांचे मत आहे.

अशा पद्धतीने कुत्रिम पद्धतीने प्रक्रिया करून गायींचे दुधाचे उत्पादन आणि त्यांचे जीवन वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

-उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required