ऋतू बदलला की आपण आजारी का पडतो? ही आहेत त्याची कारणे..

मंडळी, सध्या आपण ‘ऑक्टोबर हिट’ चा अनुभव घेतोय. साधारणपणे नोव्हेंबरपासून हिवाळा सुरु होईल. नवीन ऋतू सुरु झाला की आपल्या आरोग्यात बदल होऊ लागतात. ताप, सर्दी खोकला हे तर ठरलेले आजार आहेत. आता एक सांगा, नवीन ऋतू सुरु झाला की साथीचे रोग का पसरतात ? आहे उत्तर ? चला आज जाणून घेऊया याबद्दल विज्ञान काय म्हणतं...

स्रोत

तर त्याचं असं आहे, दोन ऋतूंच्या मधल्या काळातच रोगजंतू सर्वात जास्त पसरतात. त्याचं कारण म्हणजे या मधल्या काळात हवामान थंड असतं. सामान्य सर्दी पडशाच्या मागे प्रामुख्याने दोन रोगजंतू कारणीभूत असतात – ‘राह्यनोवायरस’ आणि ‘कॉरनव्हायरस’. या दोघांची वाढ थंड हवामानात होते. त्यांना वाढण्यासाठी पोषक थंड हवामान दोन ऋतूंच्या मधल्या काळात मिळतं. याशिवाय हिवाळा तर हा त्यांचा हक्काचा मोसम आहे.

स्रोत

मंडळी, हिवाळा हा रोगजंतूंचा सर्वात आवडता ऋतू असावा. याची काही वैज्ञानिक करणं आहेत. हिवाळ्यात जेव्हा हवामान ‘फ्रीझ’ होण्याच्या जवळ असतं तेव्हा रोगजंतूंना स्वतः भोवती ‘जेल’ (gel) सारखं कवच तयार करण्यास योग्य वातावरण मिळतं. कवच तयार झाल्यामुळे रोगजंतूंना एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत पसरण्यास मदत होते. दुसऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर हे कवच साधारण २२ डिग्री सेल्सिअसला वितळतं. इथूनच माणूस आजारी पडण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे साथीचे रोग पसरत जातात.

मंडळी, चांगली झोप, व्यायाम किंवा दरवेळी नीट हात धुतले तरी रोगजंतूंपासून आपण लांब राहू शकतो. लवकरच थंडी सुरु होणार आहे भाऊ. काळजी घ्या !!

 

आणखी वाचा :

हात धुण्याची सर्वोत्तम पद्धत....या सिम्पल ट्रिकने फक्त १० सेकंदात हात स्वच्छ होतील !!

सबस्क्राईब करा

* indicates required