computer

गंधातून आठवणींना उजाळा कसा मिळतो ? हे आहे त्यामागचं विज्ञान !!

स्पर्शाने, ऐकण्यातून, किंवा चवितून आपल्या आठवणींना उजाळा मिळतो, पण यापेक्षा जास्त प्रभाव पडतो तो गंधाने. विज्ञान म्हणतं की इतर कोणत्याही प्रकारापेक्षा गंधामुळे जलद गतीने आठवणी समोर येतात. हे असं का घडतं ? चला तर आजच्या लेखात समजून घेऊया.

तुम्ही जेव्हा बघता किंवा गोष्टींना स्पर्श करता तेव्हा ती माहिती मेंदूच्या थालामुस विभागात पाठवली जाते. हा भाग माहिती प्रक्षेपित करायचं काम करतो. थॅलेमस मधून ही माहिती मेंदूच्या वेगवेगळ्या कप्यांमध्ये पाठवली जाते. यात हिप्पोकंपास नावाचा विभाग असतो. हा विभाग आपल्या आठवणी साठवण्याचं काम करतो. दुसरा विभाग म्हणजे अॅमिग्डेल. मेंदूचा हा भाग भावनिक प्रक्रियेचं काम करत असतो. या दोन्ही विभागांकडे माहिती पाठवल्यावर आठवणी चाळवल्या जातात.

हे झालं सर्वसाधारण प्रक्रीयेबद्दल. जेव्हा आपल्याला वास येतो तेव्हाची प्रक्रिया वेगळी असते. गंधामुळे मिळालेली माहिती नेहमीप्रमाणे थॅलेमसकडे न पाठवता गंधाशी निगडीत असलेल्या ‘घाणेंद्रिय’कडे (olfactory) पाठवली जाते. घाणेंद्रिय हे थेट हिप्पोकंपास आणि अॅमिग्डेलशी जोडलेलं असतं. त्यामुळे गंधातून मिळालेली माहिती लगेचच आठवणींना उजाळा देते. तीव्र भावनाही व्यक्त होतात.

श्वसनावाटे मिळणारी ही माहिती इतर प्राण्यांसोबत मानवालाही उत्क्रांतीतून मिळालेली देणगी आहे.  मानव दोन पायांवर उभा राहून चालायला लागल्यावर गंधाचे आकलन कमी झाले असले तरी गंधाची संवेदनक्षमता इतर संवेदांपेक्षा नक्कीच जास्त आहे. गंधाशी जोडलेल्या संवेदी चेतातंतूंची संख्या मानवी शरीरात १००० एवढी असते. याविरुध्द प्रकाशाशी आणि स्पर्शाशी जोडलेल्या संवेदी चेतातंतूंची संख्या केवळ ४ एवढीच असते. 

नवीन संशोधन

याबाबतीत नवीन संशोधन २०१७ साली झालं होतं. या संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार कदाचित आठवणी या घाणेंद्रियातच साठवल्या जातात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. घाणेंद्रियातील ‘पिरीफॉर्म कोर्टेक्स’ नावाच्या भागात आठवणी साठवल्या जात

 

तर मंडळी, गंधावाटे आठवणींना उजाळा मिळतो त्यामागे हे कारण आहे. कशी वाटली ही माहिती ? आम्हाला नक्की सांगा!

सबस्क्राईब करा

* indicates required