Suryakumar yadav च्या बड्डे दिनी जाणून घ्या त्याच्या आयुष्यातील या १० खास गोष्टी....

सुर्यकुमार यादव (Suryakumar yadav). हे नाव भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील गाजू लागलं आहे. यामागचं कारण म्हणजे त्याची अप्रतिम फलंदाजी. सलामीला पाठवा किंवा मध्यक्रमात पाठवा, त्याला आपली भूमिका चांगलीच माहिती आहे. अवघ्या काही वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत थेट एबी डीविलियर्स सोबत तुलना होणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. मैदानाच्या चारही बाजूंना शॉट खेळण्याची क्षमता असल्यामुळे त्याला भारताचा मिस्टर ३६० म्हटले जाऊ लागले आहे. मात्र ही तर सुरुवात आहे. आज (१४ सप्टेंबर) सूर्यकुमार यादव आपला ३२ वा वाढदिवस (Suryakumar yadav birthday) साजरा करतोय. चला तर या खास दिवशी जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.(10 things to know about Suryakumar yadav) 

सूर्यकुमार यादवच्या आयुष्यातील १० खास गोष्टी..

१) सूर्यकुमार यादवला लहानपणी क्रिकेट नव्हे तर बॅडमिंटन खेळायला खूप आवडायचं. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बॅडमिंटनची आवड असलेला सूर्यकुमार यादव क्रिकेटपटू कसा झाला? तर झाले असे की, सूर्यकुमार यादवला घरा बाहेर पडण्यासाठी काहीतरी कारण हवं होतं आणि क्रिकेटच्या सरावासाठी भरपूर वेळ बाहेर राहण्याची संधी मिळायची. त्यानंतर बॅडमिंटन नव्हे तर क्रिकेटकडे त्याचा कल वाढू लागला आणि असा मिळाला भारतीय संघाला मिस्टर ३६० सूर्यकुमार यादव.

२) सूर्यकुमार यादवच्या वाढदिवसाची तारीख १४ आहे आणि त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द देखील याच तारखेला सुरू झाली होती. त्याने १४ मार्च २०२१ रोजी इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण केले होते.

३) सूर्यकुमार यादवची एकूण संपत्ती ३० कोटी रुपये आहे. तसेच तो एक महिन्यात ७५ लाख ते १ कोटी रुपयांची कमाई करतो. 

४) आयपीएल २०२२ स्पर्धेत त्याला मुंबई इंडियन्स संघाने ८ कोटी रुपयांची बोली लावत रिटेन केले होते. तो २०१८ पासून मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. यापूर्वी २०११,२०१२ आणि २०१३ मध्ये देखील त्याने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

५) एमएस धोनी प्रमाणेच सूर्यकुमार यादवला देखील कार खरेदी करायची आवड आहे. नुकताच त्याने मर्सिडीज-बेंझ जीएलई कूप कार खरेदी केली आहे. या कारची किंमत २.१५ कोटी रुपये आहे. यासह त्याच्याकडे १.२२ कोटी रुपयांची लँड रोव्हर डिफेंडर, ३९-४२ लाख रुपयांपर्यंतची स्कोडा सुपर्ब आहे.

६) तसेच एमएस धोनी प्रमाणेच सूर्यकुमार यादव कडे मोटार सायकल देखील आहेत. त्याच्या गॅरेजमध्ये २७ लाख रुपये किंमत असलेली बीएमडब्ल्यू आरआर 1000 आहे.

७)सूर्यकुमार यादवचं शिक्षण मुंबईतून झालं आहे. त्याने मुंबईतील पिल्लई कॉलेजमधून आपले पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 

) सूर्यकुमार यादवने जुलै २०१६ मध्ये देविशा सेठीसोबत विवाह केला होता. दोघांची भेट कॉलेजमध्येच झाली होती. त्याची पत्नी देवीशा नृत्य शिक्षिका असून ती दक्षिण भारतीय कुटुंबातील आहे.

) टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, सूर्यकुमार यादव हा भारताच्या सध्याच्या मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला फलंदाज आहे. सध्या त्याचा करिअरचा स्ट्राइक रेट १७३.२९ आहे.

१०) तसेच टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीच्या रँकिंगमध्ये तो भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलला मागे टाकत तो चौथ्या स्थानी आहे.

 

सूर्यकुमार यादवची आगामी आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required