computer

देशाची मान उंचावणाऱ्या या ११ खेळाडूंना गरिबीत का जगावं लागत आहे??

खेळाडू म्हणून ओळख मिळणे तशी सोपी गोष्ट नाही. कित्येक वर्ष स्वतःला झोकून देऊन एखाद्या खेळात प्रभुत्व प्राप्त करणे, त्याहीनंतर त्याच तोडीच्या स्पर्धकांबरोबर स्पर्धा करून पदके मिळवणे यासाठी किती संयम, धैर्य आणि मेहनत लागत असेल याचा अंदाज कोणीही करू शकतो. पण यश मिळाल्यावर पण काही खेळाडू असे असतात, ज्यांना पुढे खेळता येत नाही. त्यामागे बहुतांश वेळा आर्थिक कारणे असतात. काही खेळाडू तर स्वतःला सिद्ध करून देखील नंतर गरिबीचे आयुष्य जगताना पाहायला मिळत असतात. आज अशाच काही खेळाडूंची दुर्दैवी कहाणी आपण वाचणार आहोत.

१. दिलराज कौर

भारताची पहिली जागतिक स्तरावरील पॅराशूटर अशी ओळख मिळवलेली दिलजीत कौर. कधीकाळी सर्वोत्तम पॅरा एअर पिस्टल शूटर म्हणून ख्याती असलेली दिलजीत कौर मात्र आर्थिक कारणांनी पुढे जास्त काळ खेळू शकली नाही. एवढ्या उंचीवर गेलेली ही खेळाडू सध्या स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी बिस्कीट आणि चिप्स विकत आहे. तिला ना सरकारकडून कुठली आर्थिक मदत मिळाली, ना क्रीडाजगतातून कोणी मदतीचा हात पुढे केला.

२. कोईजम उषाराणी देवी 

कराटे या खेळात एक दोन नाहीतर, तब्बल १६ सुवर्णपदक प्राप्त करणारी ही खेळाडू. पण आर्थिक कारणांनी तिला खेळ सोडावा लागला. तिची निवड अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी झाली. पण दरवेळी पैसे नसल्याने तिला या स्पर्धांपासून मुकावे लागले. शेवटी नाईलाजाने खेळ सोडत तिने उदरनिर्वाहासाठी छोटी- मोठी कामे करायला सुरुवात केली.

३. आशा रॉय

भारताची सर्वाधिक वेगवान धावपटू म्हणून नावारूपाला आलेली आशा रॉय नंतर आर्थिक समस्यांमुळे खेळापासून दूर झाली. २०११ साली झालेल्या नॅशनल ओपन अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटरमध्ये रौप्य आणि २०० मीटरमध्ये सुवर्णपदक प्राप्त करत छाप सोडली होती. पण नंतर कुठल्याही प्रकारची आर्थिक साहाय्य न मिळाल्याने सध्या तिला स्वतःचा मूलभूत खर्च भागवणेही कठीण झाले आहे.

४. निशा राणी दत्त

तैवान येथे सर्वोकृष्ठ तिरंदाज म्हणून पुरस्कार प्राप्त खेळाडू ते दक्षिण आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवत देशाचे नाव उंचावणारी खेळाडू, इतकी मोठी झेप घेणाऱ्या खेळाडूला कोरीयाला बक्षीस मिळालेले ४ लाख रुपये किमतीचे धनुष्यसुद्धा फक्त ५०,००० रुपयांना विकावे लागले होते. एशियन ग्रँड प्रिक्समध्ये सहभागी झालेली ही खेळाडू मासिक ५०० रुपये स्टायपेंडवर दिवस काढत आहे.

५. रश्मीता पात्रा 

फुटबॉल या जगातल्या सर्वात लोकप्रिय खेळात भारत कुठेही नाही अशी तक्रार होत असते. पण अवघ्या १६ व्या वर्षी क्वालालंपूर येथे झालेल्या जागतिक फुटबॉल कन्फेडरेशनमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या रश्मीता पात्रा या खेळाडूला ओडिशा येथे एक पान टपरी चालवावी लागत आहे.

६. रिशु मित्तल 

हरियाणा स्टेट चॅम्पियनशिपमध्ये बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून तसेच इतर अनेक स्पर्धा गाजवणारी राष्ट्रीय खेळाडू रिशु मित्तलला आज लोकांची धुणीभांडी करावी लागत आहेत. 

७. शांती देवी

१९८२ आणि १९८३ साली नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या शांती देवी यांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा मेहनत करावी लागली होती. सध्या त्या भाजीपाला विकून स्वतःचे घर चालवत आहेत.

८. सीता साहू

अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ब्राँझमेडल मिळवणारी सीता साहू सांगते की शेवटचे पोट भरून जेवण केव्हा केले हे देखील तिला आठवत नाही. सरकारने तिला दिलेली आश्वासने पण पूर्ण केलेली नाहीत. पाणीपुरी विकून ती कसेबसे दिवस कंठत आहे.

 

सीता साहूबद्दल आणखी वाचा:

दोन ऑलिंपिक मेडल्स जिंकूनपण तिला आज पाणीपुरी का विकावी लागत आहे ?

९. कमल कुमार

राष्ट्रीय स्तरावरील हा सुवर्णपदक विजेता बॉक्सर आज घरोघरी जाऊन कचरा गोळा करत असतो. तो सांगतो की आपल्याला देशासाठी खेळायची खूप इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याला खेळ सोडावा लागला.

१०. सांथी सौंदराजन 

दोहा येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये रौप्यपदक प्राप्त केल्यावर लिंगचाचणीत फेल झाल्याने तिच्या खेळण्यावर बंदी आणण्यात आली. आता वीटभट्ट्यावर काम करून ती उदरनिर्वाह करत आहे.

११. नौरी मुंडू 

१९९६ साली नेहरू हॉकी टुर्नामेंटमध्ये ब्रॉंझ, १९९७ साली नॅशनल सिनियर गेम्समध्ये रौप्यपदक, तसेच तब्बल १९ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग इतका मोठा ट्रॅक रेकॉर्ड असून पण आज तिला शेती करून गुजराण करावे लागत आहे.

या सर्व खेळाडूंची कैफियत वाचली तर एक गोष्ट ढळढळीत स्पष्ट होते ती म्हणजे जोवर देशातील कर्तृत्ववान खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात नाही, तोवर ऑलिम्पिकमध्ये १-२ पदकांपेक्षा आपण पुढे जाऊ शकणार नाही.

 

आणखी वाचा:

एकेकाळचा बॉक्सिंग चॅम्पियन आपल्या मुलांना 'खेळात करियर करू नका' का सांगतोय?

सबस्क्राईब करा

* indicates required