computer

क्रिकेट स्टेडियममध्ये अजरामर झालेले ११ क्षण आणि त्या व्यक्ती!!

क्रिकेटचा सामना लाइव्‍ह पाहणे ही क्रिकेप्रेमींसाठी एक मोठा आनंदाचा सोहळा असतो. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. भारतातच नाही, तर अनेक देशात क्रिकेटप्रेमी अगदी मन लावून मॅच पाहतात. त्यांच्या भावना कॅमेऱ्यात जेव्हा टिपल्या जातात तेव्हा त्यांना तेव्हा कल्पनाही नसते. नंतर त्याच फोटोवर मीमस बनतात आणि कधीकधी त्या व्हायरलही होतात. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, निवडक फॅन्सचे ते क्षण जे क्रिकेट सामन्यापेक्षाही अविस्मरणीय होते!

१. हा पाकिस्तानचा निराश झालेला चाहता कोण विसरू शकेल?

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया ICC क्रिकेट विश्वचषक २०१९ मॅच नंतर जेव्हा पाकिस्तान हरले तेव्हा मुहम्मद सरीम अख्तर हा अतिशय निराश झाला होता. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. आजही अनेक मीममध्ये तो वापरण्यात येतो. इंटरनेटवर हा सगळ्यात प्रसिद्ध आहे.

२. "ये कोई मजाक होरा है, मारो मुझे मारो"

हा व्हिडिओ विश्वचषक २०१९ च्या वेळी सनसनाटी बनला होता. हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा आणखी एक समर्थक त्याचे नाव, मोमीन साकिब. जेव्हा भारतविरुद्ध पाकिस्तान संघ हरला तेव्हा मोमीन साकिबने चिडून खूप बडबड केली, त्याचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. विशेषतः त्याचे "मारो मुझे मारो" हे वाक्य. त्याने पाकिस्तान संघाला तंदुरूस्त नसल्याने पराभव झाला असे सांगितले. तसेच सामन्याच्या आदल्या रात्री ते बर्गर-पिझ्झा खात असल्याचेही सांगितले ." एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिये." हे वाक्य ही त्याची निराशा लपवत नाही. त्याच्या बोलण्याच्या स्टाईलमुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

3.  गुटख्याचा तोबरा तोंडात भरून फोनवर बोलणारा माणूस.! हा फोटो नुकताच व्हायरल झाला आहे.


भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी कानपूरला होती. तेव्हा कॅमेरा प्रेक्षकांमध्ये फिरतो तेव्हा हा माणूस फोनवर बोलत असताना गुटखा खात असतो. बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल होतो. नेटिझन्सनी यावर इतक्या उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत की त्याला तोंड कुठे लपवू असे झाले असेल!

४. Jarvis 69

भारत वि. इंग्लंड कसोटी चालू असताना हा पठ्ठ्या भारतीय जर्सी घालून सरळ मैदानावर गेला आणि खेळाडूंमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. YouTuber डॅनियल जार्विसने Jarvis 69 हे नाव असलेला शर्ट घातला होता आणि त्याच्या जर्सीवर बीसीसीआयचे चिन्हही होते. तो जणूकाही भारतीय टीमचा मेंबर असल्याप्रमाणे वागत होता. त्याला सुरक्षा टीमने बाहेर काढले. पण त्याचा एकंदर आविर्भाव बघून भारतीय खेळाडूंनाही हसू आवरले नाही.

५. जानेवारीमध्ये बिग बॅश लीगच्या खेळादरम्यान ॲश्टन टर्नरने मारलेला षटकार आणि प्रेक्षकाने सहज पकडलेला झेल

हा व्हिडिओ ही खूप गाजला होता. आता यात काय विशेष असे तुम्हाला वाटेल. पण या प्रेक्षकाने एका हाताने चेंडू झेलताना दुसऱ्या हातातल्या बिअरचा एक थेंबही सांडला नाही. या ऑस्ट्रेलियान मनुष्याचे कौशल्य पाहून कमेंटेटरही हैराण झाले होते.

 

What a catch from Old Mate! He's just SO casually pouched this without a worry in the world

A @KFCAustralia Bucket Moment | #BBL10 pic.twitter.com/hI5795vF39

— KFC Big Bash League (@BBL) January 30, 2021

६. "झहीर आय लव्ह यू"

२००५ मध्ये भारत पाकिस्तान कसोटी सामन्याच्या वेळी "झहीर आय लव्ह यू" असे पोस्टर एका प्रेक्षक महिलेने हातात धरले होते. त्यावेळी झहीर आणि युवराज ड्रेसिंग रूममध्ये बसले होते. या महिला प्रेक्षकावर कॅमेरा झूम झाल्यावर ती लाजून चेहरा लपवत होती. झहीर खानने हे पाहिले आणि त्याने एक फ्लाइंग किस दिला. खेळाडूंना चाहत्यांचे प्रेम हवंच असतं. ती महिला प्रेक्षक ही आपल्या लाडक्या खेळाडूचे प्रेम पाहून खुश झाली.

७. झोपलेला प्रेक्षक

२०१८ मध्ये हॅम्पशायर सोबतच्या एका T२० सामन्याच्या वेळी एका प्रेक्षकाला इतकी गाढ झोप लागली होती की त्या माणच्या डोक्यावर इतर प्रेक्षक पेये आणि पुठ्ठ्याचे ट्रे चा ढिग करतात पण तरीही तो उठत नाही. इतक्या आरडाओरडा चालू असताना, मॅच चालू असताना इतकी गाढ झोप लागावी हे पण एक कोडेच आहे.

८. 'फॉलो द लीडर'

२०१५ ला ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड एकदिवसीय सामना चालला होता. तेव्हा इंग्लंडचा रॉनीने इराणी फिल्डींग करताना वॉर्म अप करत होता. त्यावेळीं ऑस्ट्रेलियन चाहत्यानी अचानक त्याला फॉलो करणे सुरू केले. त्याचे अनुकरण करणे सुरू केले. जणू काही प्रेक्षकांनी रॉनी इराणीसोबत 'फॉलो द लीडर' खेळ खेळ खेळत होते.

९. अंबानींच्या सासूबाईंची प्रार्थना

IPL २०१७ अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंटचा अनपेक्षित पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स जिंकेल असे कोणालाच वाटत नव्हते. तेव्हा प्रेक्षकांमध्ये मुकेश अंबानींच्या सासू पूर्णिमा दलाल ही होत्या. त्या मुंबईने सामना जिंकावा म्हणून प्रार्थना करत होत्या. शेवटी मुंबई इंडियन्स टीम जिंकली आणि प्रार्थना आंटीचा फोटो व्हायरल झाला. हा सामना त्यांच्या प्रार्थनेमुळे जिंकला अशीच चर्चा होत होती.

To be honest Mumbai Indians won because of this old lady's Prayer.#IPLfinal #IPL #RisingPuneSupergiant #RSPVSMI #RPSvsMI #RPSvMI pic.twitter.com/WxzfYHFVpu

— Astik (@bhaveshastik) May 21, 2017

१०. बिअर ग्लास, झेल आणि दर्दी रसग्राहक

या वर्षी जानेवारीमध्ये मेलबर्न स्टार्स आणि हरिकेन्स यांच्यातील बिग बॅश लीगच्या सामन्यात इंग्लिश फलंदाज डेविड मलानने मारलेला षटकार अचानक बिअरच्या ग्लासमध्ये पडला. हा ग्लास एका प्रेक्षकाच्या हातात होता. त्यात बिअर होती. आणि तरीही त्याने पिणे चालू ठेवले होते.

११. स्टेडियममधले प्रपोज

स्टेडियममध्ये गर्लफ्रेंडला प्रपोज करणे म्हणजे एक धाडसच असते. कारण इतक्या लोकांसमोर तिला विचारायचे आणि तिच्या हो किंवा नाही या उत्तरावर सगळ्यांसमोर रिॲक्ट व्हावे लागते. पण जेव्हा २०१९ च्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला तेव्हा त्या विजयाच्या जल्लोषात एकाने गर्लफ्रेंडला प्रपोज केले आणि त्याच्या नशिबाने तिनेही होकारही दिला. तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि व्हिडिओ व्हायरलही झाला होता.

स्टेडियममध्ये सामना पाहणे एक वेगळाच थरार असतो. कॅमेरा समोर अनेक गोष्टी टिपल्या जातात. भले मॅच जिंकू किंवा हरू पण काही प्रेक्षक खूपच मनोरंजन करून जातात.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required