व्हिडीओ ऑफ द डे: धोनी 0 वर आउट झाल्यावरची या 9 वर्षाच्या मुलाचा त्रागा लै भारी आहे !!

लोकहो कालचा भारत पाकिस्तान सामना पाह्यला का ? जिंकलो ना आपण !! हे तर आपले शेजारी हायत राव. यांना तर आपण नेहमीच हरवतो. परवाच्या दिवशी हाँगकाँग  बरोबर आपला सामना झाला होता बघा. तवा आपन गल्लीतल्या मुलांनाही नाही शोभणार नाय अशा तर्हेने जिंकलो राव. रडतखडत !! ते पन कोणाकडनं तर हाँगकाँग  कडनं.

आता कालच्या सामन्यात ८ गडी राखून आपन जिंकलो त्यामुळं सगळं धुतलं गेलं. पण काये ना, हाँगकाँग  सोबतचा सामना परत एकदा चर्चेत आलाय. त्याबद्दल सांगण्याआधी मागची ष्टोरी ऐकून घ्या. हाँगकाँग  बरोबरच्या सामन्यात आपले ‘स्टम्पिंग चे किंग’ धोनी दादा शून्यावर बाद झाले होते. धोनी दादाच्या अख्ख्या करियर मधली शून्यावर बाद होण्याची ही ९ वी वेळ होती. आजपावेतो धोनी दादाने लय भारी खेळ दाखवलाय. त्यांच्याकडून हे अपेक्षितच नव्हतं. असो...

तर, हे सगळं स्टेडीयम मध्ये लाईव्ह बघत असलेला ९ वर्षाचा पोरगा धोनी दादा वर चिडला ना. काये ना हा पोरगा पहिल्यांदाच स्टेडीयम मध्ये बसून सामना बघत होता. पहिल्याच अनुभवत त्याला हे पाहायला मिळालं. मग चिडणार नाय तर काय. त्याने स्टेडीयम मध्येच आपला राग दाखवायला सुरुवात केली. हा राग पन कसला, धोनीकडे बघून हातवारे करत, ठेंगा दाखवत. हे सगळं कैद झालंय कॅमेऱ्यात. पोराचा राग बघून अनेकांना वाटाया लागलंय, या पोऱ्यानं माझ्या मनातली भावना व्यक्त केली. आता तुम्हीच बघा काय केलंय त्यानं. 

तुमच्या पन अश्याच भावना होत्या का ? सांगा बरं !!