गेल्या २४ वर्षात जे कोणालाही नाही जमलं ते या महाराष्ट्रातील वाघाने करून दाखवलं..

कॉमनवेल्थ २०२२ (Common welath games 2022) स्पर्धेत सध्या भारतीय खेळाडू जोरदार कामगिरी करत आहेत. अशातच महाराष्ट्रातील अविनाश साबळेने(Avinash sable) ३००० मीटर स्तीपलचेज स्पर्धेत ८:११:२० सेकंदात आपली शर्यत पूर्ण केली आणि इतिहासाला गवसणी घातली आहे. त्याने रौप्य पदकाची कमाई केली यासह त्याने आपला राष्ट्रीय विक्रम देखील मोडून काढला आहे. यापूर्वी त्याने ८:१२:४८ सेकंदात आपली शर्यत पूर्ण केली होती. कॉमनवेल्थ स्पर्धेत पदक मिळवणं ही खूप मोठी गोष्ट असते. मात्र स्तीपलचेजमध्ये पदक मिळवणं ही त्याहून ही मोठी गोष्ट आहे. काय आहे यामागच कारण? चला पाहूया.

गेली २४ वर्षे स्तीपलचेजमध्ये केनियातील खेळाडूंनी पदके मिळवली आहेत. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य ही तीनही पदकं केवळ केनियातील खेळाडू जिंकायचे. मात्र २०२२ मध्ये अविनाश साबळेने २४ वर्षांचा विक्रम मोडून काढला आहे. त्याचे सुवर्णपदक केवळ ०.०५ सेकंदांनी हुकले, त्यामुळे त्याला रौप्य पडकावर समाधान मानावे लागले आहे.

अविनाश साबळेने यावर्षी अप्रतिम कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत देखील त्याचा बोलबाला पाहायला मिळाला होता. त्यामुळे कॉमनवेल्थ स्पर्धेत तो पदक मिळवणार याची १०० टक्के खात्री होती. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून देणारा अविनाश साबळे एका रात्रीत यशाच्या शिखरावर पोहोचला नाहीये, तर त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. वयाच्या १८ व्या वर्षी तो सैन्यात भरती झाला होता. त्यानंतर त्याला त्याची वाट दिसू लागली होती. मात्र सैन्यात भरती होण्यापूर्वी त्याच्या आयुष्यात अनेक संकटे होती.

अविनाश साबळेचा जन्म १९९४ मध्ये एका शेतकऱ्याच्या घरात झाला होता. गावात राहत असल्यामुळे त्याला शाळेत जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागायचा. बस नसल्यामुळे अविनाश चक्क धावत ६ किमी अंतर गाठायचा. त्यावेळी त्याने विचारही केला नसेल की, आज आपण जे करतोय तेच करून एक दिवस कॉमनवेल्थ स्पर्धेत पदक मिळवता येईल. १२ वी झाल्यानंतर त्याची भारतीय सैन्यात निवड झाली आणि इथून त्याचा मार्ग सोपा झाला. 

वयाच्या १८ व्या वर्षी सैन्यात निवड झाल्यानंतर त्याची पोस्टिंग सियाचीन येथे करण्यात आली होती. २०१३-१४ पर्यंत सियाचीनमध्ये राहिल्यानंतर त्याला राजस्थानमध्ये पाठवण्यात आले होते. राजस्थानमध्ये काही वर्ष नोकरी केल्यानंतर त्याची बदली सिक्कीम येथे करण्यात आली होती. २०१७ मध्ये त्याला सैन्यातील प्रशिक्षकांनी स्तीपालचेजमध्ये धावण्यासाठी तयार केले होते. अवघ्या एक वर्षात त्याने राष्ट्रीय विक्रम मोडून काढला होता. अविनाश साबळेचा संघर्ष भाग मिल्खा भाग चित्रपटात दाखवण्यात आलेल्या मिल्खा सिंग पेक्षा कमी नाहीये. कारण मिल्खा सिंग यांची कारकीर्द देखील सैन्यात भरती झाल्यानंतर सुरू झाली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required