टॉप -५ फलंदाज ज्यांना २०२० नंतर वनडेत झळकावता आले नाहीये एकही शतक! यादीत ३ भारतीय...

काही दिवसांपूर्वीच आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा संपन्न झाली आहे. आता सर्व संघांनी आगामी वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेसाठी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामान्यांची मालिका सुरू आहे. तर भारतीय संघ सध्या न्यूझीलंड संघाविरुद्ध टी -२० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका देखील पार पडणार आहे. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्याचा धक्का बसेल की, वनडे क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजांना गेल्या २-३ वर्षांपासून एकही शतक झळकावता आले नाहीये. चला तर पाहूया कोण आहेत टॉप -५ फलंदाज.

१) विराट कोहली:

क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराट कोहलीला गेल्या काही महिन्यांपासून हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीला २०१९ नंतर वनडे क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नाहीये. त्याने शेवटचे वनडे शतक ३ वर्षांपूर्वी झळकावले होते. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ४३ शतके झळकावली आहेत. आता तो पुढील शतक कधी झळकावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

) रोहित शर्मा :

भारतीय संघाचा कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा गेल्या २ वर्षांपासून शतकी खेळीच्या प्रतिक्षेत आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस दुहेरी शतके झळकावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावे आहे. त्याने शेवटचे शतक १९ जानेवारी २०२० रोजी झळकावले होते. मात्र त्यानंतर त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. रोहितने आपल्या वनडे कारकिर्दीत एकूण २९ शतके झळकावली आहेत.

) डेविड वॉर्नर

वनडे क्रिकेटमधील आक्रमक सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर देखील फॉर्मच्या शोधात आहे. त्याने वनडे कारकिर्दीत आतापर्यंत एकूण १८ शतके झळकावली आहेत. तर शेवटचे वनडे शतक १४ जानेवारी २०२० रोजी झळकावले होते. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत त्याला शतक झळकावण्याची संधी होती. मात्र ही संधी हुकली आहे. येणाऱ्या सामन्यांमध्ये तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

) शिखर धवन :

विराट कोहली आणि रोहित शर्मा सह भारतीय संघातील अनुभवी फलंदाज शिखर धवनला देखील वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावता आले नाहीये. शिखर धवनने वनडे क्रिकेटमध्ये एकूण १७ शतके झळकावले आहेत. त्याने वनडे क्रिकेटमधील शेवटचे शतक ९ जून २०१९ रोजी झळकावले होते. आता न्यूझीलंड विरुध्द होणाऱ्या वनडे मलिकेत शतकांची प्रतीक्षा संपवण्याची संधी असणार आहे. 

) जो रूट :

इंग्लंडचा सर्वात अनुभवी फलंदाज जो रूटला ही गेल्या २-३ वर्षांपासून हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. रुटने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत १६ शतके झळकावली आहेत. विराट कोहली आणि शिखर धवन प्रमाणेच जो रूटने एकदिवसीय शतक झळकावून तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

काय वाटतं? न्यूझीलंड विरुध्द होणाऱ्या वनडे मालिकेत शिखर धवन चांगली कामगिरी करून भारतीय संघात आपले स्थान निश्चित करेल का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required