computer

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सलग ६ चौकार मारण्याचा विक्रम करणारे ५ फलंदाज..

क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यात खेळाडू रणनिती आखून मैदानात उतरत असतात. कुठल्या फलंदाजाला कुठला चेंडू टाकला की, तो बाद होऊ शकतो. तसेच कुठल्या गोलंदाजाविरुद्ध फलंदाजी करताना आक्रमण करायचे. या सर्व गोष्टींची चर्चा खेळाडू आपल्या प्रशिक्षकांसोबत करत असतात. परंतु वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल सारखे काही आक्रमक फलंदाज आहेत ज्यांना गोलंदाज कोण आहे या गोष्टीशी घेणं देणं नसतं. प्रत्येक चेंडूवर हे फलंदाज आक्रमण करण्याच्या प्रयत्नात असतात. युवराज सिंग आणि हर्षल गिब्स सारख्या फलंदाजांनी तर एकाच षटकात सलग ६ षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तर काही असे देखील फलंदाज आहेत ज्यांनी एकाच षटकात सलग ६ चौकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोण आहेत ते फलंदाज? चला जाणून घेऊया.

१) संदीप पाटील (Sandeep Patil)

Sandeep Patil

ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर १९८२ मध्ये झालेल्या सामन्यात संदीप पाटील यांनी एकाच षटकात षटकात सलग ६ चौकार मारण्याचा विक्रम केला होता. हा पराक्रम त्यांनी बॉब विलीसच्या गोलंदाजीवर केला होता. या डावात त्यांनी १८ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने १२९ धावांची खेळी केली होती.

 

२) ख्रिस गेल (chris gayle)

Chris Gayle

युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने टी२० क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. खेळाचे स्वरूप कुठलेही असो मात्र ख्रिस गेलचा फलंदाजी करण्याचा अंदाज हा नेहमीच आक्रमक असतो. त्याने चक्क कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सलग ६ चौकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. २००४ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने मॅथ्यू होगार्डच्या एकाच षटकात त्याने सलग ६ चौकार मारले होते.

३) रामनरेश सारवन ( Ramnaresh sarwan)

Ramnaresh sarwan

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये २००६ मध्ये कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेतील एका सामन्यात रामनरेश सारवनने मुनाफ पटेलच्या एका षटकात सलग ६ चौकार मारण्याचा पराक्रम केला होता.  

४) सनथ जयसुर्या (Sanath jayasurya)

Sanath jayasurya

कसोटी क्रिकेटमध्ये सनाथ जयसुर्याने देखील एकाच षटकात सलग ६ चौकार मारले आहेत. त्याने हा पराक्रम कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक जेम्स अँडरसन विरुद्ध खेळताना केला होता. २००७ मध्ये ज्यावेळी इंग्लंड संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी सनाथ जयसुर्याने हा कारनामा केला होता.

 

५) तिलकरत्ने दिलशान (Tillakratne Dilshan)

Tillakratne dilshan

श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशानच्या नावे देखील एकाच षटकात सलग ६ चौकार मारण्याची नोंद आहे. त्याने हा पराक्रम २०१५ मध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत केला होता. त्यावेळी वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मिचेल जॉन्सनच्या षटकात त्याने खणखणीत ६ चौकार मारले होते. 

काय वाटतं मंडळी असा कोण भारतीय फलंदाज आहे जो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सलग ६ चौकार मारण्याचा पराक्रम करेल? कमेंट करून नक्की सांगा...

सबस्क्राईब करा

* indicates required