जे ८४ वर्षांत कोणालाही नाही जमलं ते मॅक्युलमने करून दाखवलं! टीम इंडियाविरुध्द खेळताना रचला इतिहास..

 कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक पूर्ण करणं खूप मोठी गोष्ट आहे. खूप कमी असे खेळाडू आहेत जे तिहेरी शतक झळकावण्यात यशस्वी ठरतात. कारण सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्करांसारख्या दिग्गजांना ही कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावता आले नाहीये. मात्र वर्तमान क्रिकेटमध्ये तुम्ही जर पाहिलं, तर प्रत्येक संघात असे खेळाडू आहेत ज्यांनी तिहेरी शतक झळकावले आहे. मात्र न्यूझीलंड संघात ब्रँडन मॅक्युलम हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडसाठी तिहेरी शतक झळकावले आहे. हा पराक्रम त्याने आजच्याच दिवशी केला होता.

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर होता. मालिकेतील दुसरा सामना १४ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनच्या मैदानावर सुरू झाला. या सामन्यात ब्रँडन मॅक्युलमने भारतीय गोलंदाजांचा झोड घेत तिहेरी शतक झळकावले होते. असा पराक्रम करणारा तो न्यूझीलंडचा पहिलाच फलंदाज ठरला. आजपर्यंत हा विक्रम त्याच्याच नावे आहे. दुसरा कुठलाही फलंदाज हा विक्रम मोडू शकलं नाहीये. .

पाचव्या दिवशी झळकावले तिहेरी शतक..

न्यूझीलंड संघ जेव्हा पाचव्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी न्यूझीलंड संघाची धावसंख्या ६ गडी बाद ५७१ धावा होती. तर ब्रँडन मॅक्युलम २८१ धावांवर फलंदाजी करत होता. त्याने पहिल्याच सेशनमध्ये आपले तिहेरी शतक पूर्ण केले. मात्र विक्रमी खेळी केल्यानंतर लगेचच तो बाद झाला. जहीर खानने त्याला चालतं केलं. त्याने ५५९ चेंडूंचा सामना करत ३२ चौकारांच्या साहाय्याने ३०२ धावांची खेळी केली होती. 

जिमी निशमचे पदार्पणात शतक..

या सामन्यातील दुसऱ्या डावात पदार्पणवीर जिमी निशमने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकावले होते. तसेच ब्रँडन मॅक्युलम सोबत मिळून त्याने १७९ धावांची भागीदारी देखील केली होती. 

सामना राहिला अनिर्णीत..

दुसऱ्या डावात धावांचा डोंगर उभारणारा न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या १९२ धावांवर संपुष्टात आला होता. तर भारतीय संघाने ४३८ धावा करत २४६ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाने आपला डाव ६८० धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३ गडी बाद १६६ धावा केल्या होत्या. हा सामना अनिर्णीत राहिला होता. भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक १०५ धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्मा ३१ धावांवर नाबाद होता.

 हा सामना तुम्ही लाईव्ह पाहिला होता का? पाहिला असेल तर तुमच्या या सामन्यातील काही खास आठवणी कमेंट करून नक्की कळवा. 

सबस्क्राईब करा

* indicates required