१३ कोटींच्या आलीशान गाड्या ते २३२ कोटींचे घर; अशी आहे मास्टर ब्लास्टर सचिनची एकूण संपत्ती..

जेव्हा जेव्हा क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंचा उल्लेख केला जातो त्यावेळी सचिन तेंडुलकर हे नाव सर्वोच्च स्थानी असतं. कारण आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. तसेच १०० शतके झळकावली आहेत. विक्रमांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, त्याने असे काही विक्रम केले आहेत जे सहज मोडता येणार नाही. त्यामुळे सचिनला गॉड ऑफ क्रिकेट असे देखील म्हणतात. मात्र यशाच्या शिखरावर असलेल्या साचिनला देखील आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला होता. सचिनचे बालपण मध्यमवगीर्य कुटुंबात गेले. मात्र क्रिकेटने त्याला सर्व काही मिळवून दिलं. सध्या तो सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. चला तर पाहूया सचिन तेंडुलकरच्या एकूण संपत्तीबद्दल अधिक माहिती.

स्वतःची कार असणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. सचिन तेंडुलकरने देखील हे स्वप्नं पूर्ण करत मारुती सुझुकी ८०० गाडी खरेदी केली होती. ही त्याची पहिली कार होती. आज त्याच्याकडे ७ आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत १३ कोटी रुपये आहे. इतकेच नव्हे तर मुंबईतील वांद्रे परिसरात त्याचा ६००० स्क्वेअर फूटचा आलिशान बंगला आहे, या आलिशान घराची किंमत १०० कोटी रुपये आहे. त्याने २००७ मध्ये हा बंगला ३९ कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्याच्या या आलिशान बंगल्याबद्दल सांगायचं झालं तर, हा बंगला तीन मजली आहे. या बंगल्यातील ग्राउंड फ्लोअरला ५० गाड्या पार्क करता येतील इतकी मोठी पार्किंग आहे. तर स्विमिंग पूल आणि जिमची देखील सोय आहे.

तसेच सचिन तेंडुलकरचा वांद्रा येथील कुर्ला कॉम्प्लेक्समध्येही एक फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत ६ ते ७ कोटी रुपये आहे. याशिवाय केरळमध्ये ७८ कोटी रुपयांचे वॉटर फेसिंग हाऊस आहे. इतकेच नव्हे तर सचिनने इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत भागात लॉर्ड्स क्रिकेट मैदानाजवळ एक घर खरेदी केली आहे. सेंट जोन्स वुडमध्ये असलेल्या या घराची किंमत ४७ कोटी रुपये आहे. 

आता त्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर, सचिन तेंडुलकरकडे एकूण १२७१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर देखील सचिन तेंडुलकर जाहिरातीतून वर्षाला १८ कोटींची कमाई करतो. सचिन तेंडुलकर हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने एमआरएफ सोबत १०० कोटींचा करार केला होता.

आता सचिन तेंडुलकरच्या गाड्यांबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे सध्या एकूण ७ कार आहेत. यापैकी पहिली बीएमडब्ल्यू आय ८ आहे. या कारची किंमत २.६२ कोटी आहे. तर फरारी ३६० मॅडोनची किंमत २ कोटी रुपये आहे. त्यानंतर निसान जीटी आरची किंमत २.१२ कोटी आहे. यानंतर बीएमडब्ल्यू एम ६ ग्रेन कपची किंमत १.८५ कोटी इतकी आहे. तसेच ८५ लाखांची ऑडी कार देखील आहे. एमएस धोनीप्रमाणेच सचिन तेंडुलकरने देखील कारचे कलेक्शन केले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required