डेव्हिड वॉर्नरची ही करामत तुम्ही पाहिली का?

आयपीएलचा १०वा हंगाम सुरू झालाय आणि नेहमीप्रमाणे इथंही खूप काही लक्षवेधक बघायला मिळतंय. ज्यांनी ६ एप्रिलला सनरायझर्स हैद्राबाद विरूध्द गुजरात लायन्स हा सामना पाहिला त्यांनी डेव्हिड वॉर्नरची ही करामत पाहिली असेलच.

  गुजरात लायन्स संघाने जमवलेल्या १३५ धावांचा पाठलाग करण्यासाठी हैद्राबाद संघाचा कप्तान डेव्हिड वॉर्नर आणि मोइसेस अॉनरीकेज मैदानावर उतरलेले होते. दरम्यान बासिल थंपीने टाकलेल्या एका चेंडूवर अॉनरीकेजने लॉन्ग-अॉनवर फटका मारला आणि हा चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात बासिल थंपी खाली पडला. यात त्याच्या पायातले बूटही निघून पडले. यावेळी नॉन स्ट्राईकवर असणार्‍या डेव्हिड वॉर्नरने चक्क रन घेताना मध्येच थांबून तो पडलेला बूट थंपीच्या हातात दिला, आणि मग आपली रन पूर्ण केली.

सबस्क्राईब करा

* indicates required