या पेटीत लपवली जाते फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी !!

परवाच फ्रांसने क्रोएशियाला मागे टाकून फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी मिळवली. ही ट्रॉफी म्हणजे प्रत्येक फुटबॉल खेळाडूचं स्वप्न असतं. पण तुम्हाला माहित आहे का ही ट्रॉफी विजेत्या संघाकडे जाण्याआधी कोणाकडे असते ?

मंडळी, फुटबॉल वर्ल्डकपची ट्रॉफी तब्बल १५ मिलियन डॉलर्सची असते. ही ट्रॉफी शेवटचा सामना खेळला जात असताना स्टेडीयम मध्ये आणली जाते. स्टेडीयम मध्ये आणताना तिला सांभाळण्यासाठी एका खास पेटीची गरज होती. हे काम फ्रान्सच्या लुई वितों या नामांकित कंपनीकडे सोपवण्यात आलं. या कंपनीने एका अशा पेटीची निर्मिती केली जी ट्रॉफी एवढीच खास आहे.

स्रोत

मंडळी, ही काही साधी पेटी नव्हे. टायटॅनियम या मौल्यवान धातूचा वापर करून तिला तयार करण्यात आलंय. त्याचबरोबर पेटीला असलेले बकल हे ‘रुथेनियम’ या दुर्मिळ धातूपासून तयार करण्यात आलेत. लुई विताँ कंपनीचा खास टच देण्यासाठी पेटीचे चारी कोपरे चामड्याने बनवले आहेत. पेटी उघडण्यासाठी एक खास पासवर्ड सुद्धा लावण्यात आलाय. स्टेडीयम मध्ये आणताना २ सुरक्षारक्षक पेटीचं संरक्षण करतात.  

एकंदरीत ट्रॉफीला शोभेल असाच पेटीचा थाट आहे राव. यावर्षी फिफा वर्ल्डकप तर्फे ट्रॉफी स्टेडीयम मध्ये आणण्याचा एक व्हिडीओ रिलीज करण्यात आलाय. यात तुम्ही पेटीचा व ट्रॉफीचा प्रवास बघू शकता.

लूई वीटॉन या कंपनीविषयी थोडक्यात :

लुई विताँ फ्रांसची एक नामांकित कंपनी असून फॅशनच्या जगातील लग्झरी गोष्टी तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे चामड्याचे उत्पादन खास प्रसिद्ध आहेत. याशिवाय शूज, कपडे, घड्याळे, दागिने, गॉगल्स, पेट्या इत्यादी उंची वस्तूंसाठी लूई वीटॉन ओळखली जाते. लुई विताँचा जगातील प्रमुख फॅशन हाऊसेस मध्ये समावेश होतो.

 

 

आणखी वाचा :

...म्हणून वर्ल्डकप सामने दर चार वर्षांनीच होतात !!