हा आहे जगातला सर्वात लांबलचक आडनाव असलेला क्रिकेटर....पैजेवर सांगतो तुम्हाला त्याचं नावच उच्चारता येणार नाही!!

साधारणपणे क्रिकेटर त्याच्या धावांसाठी, चौकार-षटकारांसाठी, विकेट्ससाठी ओळखला जातो. पण इतिहासात एक असा क्रिकेटर होऊन गेला जो त्याच्या आडनावामुळे गाजला. चला तर भेटूया इतिहासातील सर्वात मोठं आडनाव असलेल्या या कक्रिकेटपटूला.

स्रोत

फिजीचे क्रिकेटर आय. एल. बुला यांचं खरं नाव होतं Ilikena Lasarusa Talebulamaineiilikenamainavaleniveivakabulaimainakulalakebalau!! लागला ना दम? कीबोर्डवर लहानमुलाने ‘अंडूगुंडू’ लिहून ठेवल्यासारखं किंवा कीबोर्डवर मांजर नाचून गेल्यावर जी अक्षरं तयार होतील तसंच हे नाव वाटतं ना? पण या आडनावाला एक अर्थही आहे. या आडनावाचा अर्थ आहे की : ‘लाऊ ग्रुपमधल्या (लाऊ भेटसमूह) लॅकेबा बेटावरच्या नंकुला हॉस्पिटलमधून जिवंत परत आला’. हा अर्थ असा विचित्र का? या प्रश्नाला उत्तर नाही राव.

आय. एल. बुला यांचं आडनाव त्याकाळातल्याच काय,  कदाचित आजच्याही कोणत्याही फर्स्ट क्लास क्रिकेटरच्या आडनावापेक्षा सर्वात मोठं आहे. नावाचा उच्चार कठीण असल्याने त्यांना आय. एल. बुला हे लहान आणि सुटसुटीत नाव मिळालं. 

स्रोत

मंडळी, फक्त नावामुळेच नाही तर क्रिकेटमधल्या दमदार कामगिरीमुळेही त्यांना नावलौकिक मिळाला. असं म्हणतात की फिजीच्या क्रिकेट इतिहासातील हा एकमेवाद्वितीय खेळाडू होता. त्यांनी फिजीसाठी ९ सामने खेळले आणि या सर्व सामन्यांमध्ये मैदान गाजवलं. त्यांच्या तुफान षटकारांनी त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.
  
तर, अशा या अनोख्या खेळाडूचा आज वाढदिवस आहे. आज ते ९७ वर्षांचे आहेत. फिजीच्या इतिहासातील एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून ते आजही ओळखले जातात.

आता बोभाटाच्या वाचकांसाठी आम्ही एक चॅलेंज देत आहोत. Talebulamaineiilikenamainavaleniveivakabulaimainakulalakebalau हे आडनाव एका दमात उच्चारा आणि त्याचा व्हिडीओ आम्हाला पाठवा. बघू कोणाला हे जमतंय!!

सबस्क्राईब करा

* indicates required