दुर्गा पूजेत जाण्यासाठी हा क्रिकेटर बनला होता ‘सरदारजी’...ओळख पाहू कोण आहे हा ?

भारतीय क्रिकेट संघाचे एकेकाळचे दादा ‘सौरव गांगुली’ याचं ‘A Century is Not Enough’ हे चरित्र प्रकाशनास सज्ज झालं आहे. या पुस्तकाचा काही भाग त्याने नुकताच प्रकाशित केला. या भागात त्याने तो कॅप्टन असतानाचा एक किस्सा सांगितला आहे.

त्याने म्हटलंय की ‘मला दुर्गा पूजा फार आवडते’. तो जेव्हा कॅप्टन होता तेव्हा त्याने आपल्या घराजवळच्या पूजा मंडपामध्ये भाग घेण्याचं ठरवलं, पण प्रसिद्ध असल्याने तो सामान्य नागरिकाप्रमाणे गर्दीत जाऊ शकत नव्हता. गर्दीत मिसळण्यासाठी अनेक प्रसिद्ध माणसांनी जे केलं तेच त्यानेही केलं.  तो चक्क ‘बंगाली बाबू’चा पंजाबचा सरदारजी झाला. एकूण सौरव गांगुलीचा ‘हरभजनसिंग’ झाला राव.

त्याची पत्नी ‘डॉना रोय’ ने एका मेकअप आर्टीस्टला बोलावून त्याच्याकडून सौरव गांगुलीचं रुपांतर एका सरदारजीमध्ये करून घेतलं. त्याचे नातेवाईक त्याला हसून म्हणाले की ‘तुला कोणीही ओळखेल’. पण आपल्या दादाने कोणाचंच ऐकलं नाही आणि तो दुर्गापूजेत जाऊन पोहोचला.

खरं तर त्याच्या नातेवाईकांनी त्याला बरोबर सल्ला दिला होता. त्याला पोलिसांनी ओळखलंच. एक पोलीस त्याच्या जवळ आला आणि त्याला निरखून बघितल्यावर तो हसला. दादाने त्याला ही गोष्ट टॉप सिक्रेट ठेवण्याबद्दल विनंती केली.

दुर्गा पूजा वर्षातून एकदाच येत असल्याने असं धाडस करणं मजेशीर असल्याचं तो म्हणाला.

सबस्क्राईब करा

* indicates required