रवी शास्त्री अन् गॅरी सोबर्सने आधी सलग ६ षटकार मारूनही हर्षल गिब्सचा रेकॉर्ड श्रेष्ठ का?

क्रिकेट खेळताना कुठला फलंदाज एकाच षटकात सलग ६ षटकार मारेल अशी कोणी कल्पनाही केली होती. मात्र १९६८ मध्ये सर गॅरी सोबर्स यांनी हे करून दाखवलं. सुरुवातीला यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता. त्यानंतर रवी शास्त्रींनी देखील पुन्हा एकदा १९८५ मध्ये याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली. त्यावेळी देखील हा कारनामा करणं सोपं काम नव्हतं. मात्र २००७ मध्ये सेंट किट्सच्या मैदानावर पुन्हा एकदा हे दृश्य पाहायला मिळाले होते.

गॅरी सोबर्स हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ६ षटकार मारणारे पहिलेच फलंदाज होते. त्यानंतर भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री यांनी हा कारनामा केला होता. या दोन्ही दिग्गजांनी हा कारनामा केल्याच्या बऱ्याच वर्षांनंतर हर्षल गिब्सने देखील हाच पराक्रम करून दाखवला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं होतं की, कुठल्या फलंदाजाने एकाच षटकात सलग ६ षटकार मारले होते. रवी शास्त्री आणि गॅरी सोबर्स यांनी हा कारनामा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना केला होता.

वर्ल्ड कप स्पर्धेत गिब्सचा धमाका..

हे पहिल्यांदाच घडलं होतं त्यामुळे हे खूप खास होतं. त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे हे त्याने वर्ल्ड कपमध्ये फलंदाजी करताना करून दाखवलं होतं. दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना २९ व्या षटकापर्यंत २ गडी बाद १७८ धावा केल्या होत्या. हर्षल गिब्स आणि जॅक कॅलिस हे दोघेही फलंदाजी करत होते. त्यावेळी नेदरलँड संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी डान वेन बुंजा गोलंदाजी करण्यासाठी आला. हे त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वात खराब षटक ठरले.

हर्षल गिब्सने पहिला चेंडू लाँग ऑनच्या दिशेने मारला. तर ४ चेंडू त्याने लाँग ऑफ आणि डीप मिडविकेटच्या दिशेने मारले. षटकातील अंतिम चेंडू त्याने डीप मिविकेटला मारत नवा किर्तीमान प्रस्थापित केला.

नंतर या फलंदाजांनी मारले सलग षटकार..

गिब्सने हा कारनामा केल्यानंतर अवघ्या काही महिन्यानंतर युवराज सिंगने देखील हा कारनामा करत इतिहास रचला. त्याने टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सलग ६ षटकार मारले. त्यानंतर वेस्ट इंडिजच्यास कायरन पोलार्डने श्रीलंका विरूध्द फलंदाजी करताना आणि अमेरिकेच्या जसकरन मल्होत्राने पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध खेळताना हा कारनामा केला होता. 

काय वाटतं, असा कुठला फलंदाज आहे जो युवराजचा टी -२० क्रिकेटमध्ये सलग ६ षटकार मारण्याचा विक्रम मोडू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required