लॉर्ड शार्दूल ठाकूरने घेतलेली हुकुमी विकेट आणि क्रिकेटरसिकांनी त्यावर केलेले हे भन्नाट मीम्स!! तुम्हांला यातलं कोणतं आवडलंय??

ओव्हल मैदानावर भारतानं १९७१नंतर प्रथमच कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम आज केला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाचे भरभरून कौतुक केलेच, याशिवाय भारतातील चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला. भारताच्या या विजयात रोहित शर्माचे शतक, शार्दूल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी आणि अन्य सहकाऱ्यांचे योगदान खूप महत्वाचे ठरले. जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजानं अचूक गोलंदाजी करत पूर्ण डाव उलटवला अन् भारताचा विजय पक्का केला. भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडल्यानंतर भारत ही मॅच हरणार असेच सर्वांना वाटत होते. पण भारतीय खेळाडूंनी ज्या प्रकारे जिद्दीने मॅच खेचून आणली त्याला तोड नाही. दुसऱ्या डावात ४६६ धावांची आघाडी घेत इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय फलंदाजी जशी चमकली तशीच गोलंदाजी ही भेदक झाली. जसप्रीत बुमराहनं लंच ब्रेकनंतर ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांचा त्रिफळा उडवून कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण केले. तिथेच भारताचा विजय पक्का झाला. शार्दुल ठाकूरने रुटची विकेट घेऊन इंग्लंडची मॅच वाचवायची आशा ही संपवली.

भारताच्या या विजयानंतर एकापेक्षा भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी आपला आनंदच जणू व्यक्त केला आहे. वीरेंद्र सेहवाग यानं इंग्लंडची फिरकी घेतली. त्याने "भारतीय संघ फक्त फिरकी घेणाऱ्या खेळपट्टीवर जिंकू शकतो, त्यांच्यासाठी हा खास मेसेज,'' असे म्हणत सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली. शार्दुल ठाकूर तर या मॅचचा हिरो झाला, त्यांच्यावर अनेक मीमस व्हायरल झाली. त्याला लॉर्ड ही पदवी चाहत्यांनी दिली आहे. तर भारतीय गोलंदाजांचे मीमस् पण खूप मजा आणत आहे. अजून पाचवी टेस्ट मॅच बाकी आहे. पण आता मालिकेत भारत हरणार नाही हे पक्के झाल्याने इंग्लंड पाचव्या कसोटीत कसे खेळते हे पाहणेही रंजक ठरेल. एकापेक्षा एक गमतीदार मीम्स तुम्ही पाहून घ्या आणि तुम्हाला कोणते आवडले हे ही कमेंट करून सांगा.

लॉर्ड ठाकूर

 

लॉर्ड ठाकूर पुन्हा एकदा

लॉर्ड शार्दूल जॉन स्नो

आपलं काही खरं नाही 

राणी ने पण मान्य केलं 

 

शीतल दरंदळे 

सबस्क्राईब करा

* indicates required