computer

भन्नाट!! २.५ सेकंदांत १००चा स्पीड घेणारी अस्सल देशी जगातली सर्वात वेगवान कार!!

कार शौकीन गाडी घेताना ज्या गोष्टींचा सर्वप्रथम विचार करतात. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कारचा वेग. भारतात पण वेगवान कार्सचे चाहते कमी नाहीत. एका भारतीय कंपनीने आता थेट जगातील सर्वात वेगवान कार बनवली आहे.

एकोंक असे या कारचे नाव आहे. वाझीरानी ऑटोमोटिव्ह या कंपनीने ही कार तयार केली आहे. कंपनीने कारविषयी केलेला दावा थक्क करणारा आहे. अवघ्या २.५४ सेकंदात ही कार ताशी १०० चा स्पीड घेते. याच कारणाने ही कार जगातील सर्वात वेगवान कार म्हटली जात आहे.

या कारला छप्पर नाही आणि ही एक सीटर कार आहे. डिझाईनच्या बाबतीतही अफलातून अशी आहे. यात असलेली भन्नाट बाब म्हणजे ही कार अल्टोपेक्षा कमी वजनाची आहे. यातही विशेष म्हणजे ही कार इलेक्ट्रिक आहे.

हीच कंपनी भविष्यात येणारी शूल ही हायपरकार याच तंत्रज्ञानावर आधारित बनविणार आहे. याचा अर्थ भविष्यात यापेक्षाही वेगवान आणि वजनाने कमी अशी कार रस्त्यांवर दिसू शकते. एकोंकचे वजन आहे ७३८ किलो म्हणजेच अल्टोपेक्षा १० किलो कमी आहे.

वाझीरानी एकोंकला पॉवर ७२२hp इलेक्ट्रिक पॉवरट्रेनमुळे मिळते. कारच्या बॅटरीत DiCo एयर कूलिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे कारच्या बॉडीचे तापमान संतुलित राहते. एकोंक हे नाव देण्यामागे भारतीय शास्त्रांमध्ये असलेले नव्या गोष्टीचा जन्म हे तत्व असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

या कारमध्ये लेंथी बोनट, फुल विड्थ LED लाईट बार, कारच्या पुढच्या बाजूला रियल व्हील्सवर Ek लिहिलेले आहे. या सर्व गोष्टींमुळे ही कार चांगलीच आकर्षक झाली आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required