computer

आयपीएल२०२२च्या हाती राखून ठेवलेल्या भिडूंची म्हणजे Retained players यादी आली !

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी नव्याने लिलाव होणार आहे. त्यासाठी खेळाडू सध्या ज्या संघांकडून खेळतात. त्या संघांना प्रत्येकी चार खेळाडू स्वतःकडे ठेऊन बाकी खेळाडूंना लिलावासाठी मोकळे करता येते. क्रिकेटप्रेमींचे लक्ष कोणता संघ कोणते खेळाडू स्वतःकडे ठेवतो याकडे लागले होते.आता ही पूर्ण यादी समोर आली आहे.

या संघांना जास्तीतजास्त चार आणि कमीतकमी कितीही खेळाडू ठेवता येतात. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली यांनी प्रत्येकी चार खेळाडू स्वतःकडे ठेवले तर हैदराबाद, राजस्थान आणि बँगलोर यांनी तीन खेळाडू स्वतःकडे ठेवले आहेत. तर पंजाबने फक्त दोन खेळाडू रिटेन केले आहेत.

यातही संघांनी अनेक दिग्गज खेळाडूंना रिलीज (Released Players) केले आहे. या रिलीज केलेल्या खेळाडूंना आता लिलावाच्या माध्यमातून कुठलाही संघ विकत घेऊ शकणार आहे. यात मुंबईने हार्दिक पांड्या आणि ट्रेंट बोल्ट, चेन्नईने सुरेश रैना आणि फाफ डुप्लसीस, पंजाबने केएल राहुल आणि क्रिस गेल, दिल्लीने रबाडा आणि शिखर धवन, बँगलोरने काइल जेमिसन आणि हर्षल पटेल, कोलकाताने पॅट कमिन्स आणि लॉकि फर्ग्युसन आणि राजस्थानने बेन स्टोक्स आणि डेव्हिड मिलर या दिग्गजांना रिलीज केले आहे.

तर या आयपीएल संघांनी रिटेन (Retained players) म्हणजेच स्वतःकडे ठेवलेले खेळाडू हे खालीलप्रमाणे आहेत.

चेन्नई - महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली.

पंजाब - मयंक अग्रवाल, अर्शदीप सिंग

बँगलोर - विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज

दिल्ली - ऋषभ पटेल, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरीक नॉर्टजे

कोलकाता - वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन

राजस्थान - संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल

हैदराबाद - केन विल्यम्सन, अब्दुल समद, उमरान मलिक, 

मुंबई - रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, किरोन पोलार्ड, 

या व्यतिरिक्त यंदाच्या सिजनमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद असे दोन नवे संघ सामील झाले आहेत. लिलावात या संघांना रिलीज केलेले खेळाडू विकत घेता येणार आहेत.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required