computer

त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये ६ बॉल्सवर ६ सिक्स मारून सामना कसा फिरवला?

क्रिकेटमध्ये एकेका बॉलगणिक खेळ बदलत असतो. कधी काय होईल याचा नेम नसतो. शेवटच्या ओव्हरमध्ये जर २०-२५ धावा हव्या असतील आणि बॅटसमनने चौकार षटकार उधळत त्या धावा केल्या तर सामना अतिशय रोमांचक झाला असे आपण म्हणतो. मात्र आज आम्ही अशा सामन्याबद्दल सांगणार आहोत, ज्याची गणना रोमांचक प्रो-मॅक्स अशी करता येईल.

आयर्लंडमध्ये क्रिकेट क्लबचे सामने सुरू होते. क्रेगा आणि बालेमाना असे दोन क्लब एकमेकांसमोर होते. क्रेगा क्लबने उभी केलेली धावसंख्या गाठत असताना एक वेळ अशी आली की एकाच ओव्हरमध्ये बालेमानाला ३५ धावा करणे आवश्यक होऊन बसले. एका ओव्हरमध्ये ३५ धावा करायच्या तर सर्वच्या सर्व बॉल्सवर सिक्स मारणे गरजेचे होऊन बसते.

ओव्हर सुरू झाली आणि बालेमानाचा बॅट्समन जॉन ग्लास याने एका मागोमाग एक सिक्सर मारत थेट ६ बॉल्सवर ६ सिक्स मारून एका झटक्यात सामना फिरवला. हा सामना क्रेगा क्लब सहज जिंकेल असे वाटत होते. तो सामना या पठ्ठ्याने आपल्या तुफान बॅटिंगने स्वतःच्या क्लबला जिंकून दिला.

एका साध्या क्लबचा सामना असला तरी जॉन ग्लास या भावाच्या जोरावर या सामन्याची दखल पूर्ण जगात घेतली जात आहे. साहजिक इतका धावांचा डोंगर रचल्यावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यालाच मिळाला. विशेष म्हणजे त्यांचा क्लब बॉलिंग करत असताना जॉनच्या मोठ्या भावाने हॅट्रिक घेतली होती.

अशा पद्धतीने दोन्ही भावांनी मिळून सामना जिंकून दिला.

सबस्क्राईब करा

* indicates required