computer

KKR च्या ५४ आकड्याचं रहस्य काय आहे? कालच्या सामन्यात या आकड्याने खेळ बदलला का?

कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात काल खेळण्यात आलेल्या सामन्यात कॅप्टन इयान मॉर्गनच्या संयमी खेळीच्या जीवावर कोलकाताने विजय मिळवला आहे. पण या सामन्यात मात्र एक अनोखी घटना घडली. सामन्यापेक्षा जास्त चर्चा या घटनेची होत आहे.

मैदानावर सामना सुरू असताना कोलकाता संघाचे मार्गदर्शक नाथन लिमन यांनी एक कार्ड मैदानावरील कॅप्टन इयान मॉर्गन यांना दाखवला, ज्यावर ५४ हा आकडा लिहिलेला होता. आता या ५४ चा अर्थ काय याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न कमेन्टेटर्स आणि प्रेक्षकांनी लावून पाहिला. सर्व अंदाज मात्र अंदाजच राहिले. या ५४ अंकामागील कोडे मात्र सुटलेले नाही.

कोलकाताची बॉलिंग सुरू असताना पंजाबचा स्कोर ९.३ ओव्हरमध्ये ४७ होता. ही दहावी ओव्हर कोलकाताचा प्रसिद्ध कृष्णा टाकत होता. त्याचवेळी कोलकाताच्या स्टाफकडून अशा पद्धतीने नंबर दाखविले गेल्याने संभ्रम तयार झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या विषयाला धरून आता अनेक चर्चांना उधाण आलंय

वीरेंद्र सेहवागने नाथम लिमन आणि कोलकताचा कॅप्टन इयान मॉर्गनवर या विषयावरून टीका केली आहे. असे कोडवर्ड आर्मीत वापरले जात असतात अशा शब्दांत त्याने सुनावले आहे. जर बाहेरून टीमला चालवले जात असेल तर मग मैदानावरील कॅप्टनचा उपयोग काय, असा प्रश्न देखील त्याने उपस्थित केला आहे.

खरे तर मैदानाबाहेरून मैदानावर जो ५४ हा आकडा दाखविण्यात आला, तो कोलकाताच्या योजनेचा भाग असण्याची शक्यता जास्त आहे. आता प्रश्न उपस्थित होणे देखील साहजिक आहे. काहींनी तर विचारलं की उद्या सर्वच टीम असे करायला लागले तर काय?

नाथन लिमन यांना असे केल्याप्रकरणी या आधी देखील टीका सहन करावी लागली आहे. इंग्लंड संघासोबत काम करत असताना लिमन यांनी २०२० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात मॉर्गनला काही अंक दाखवून संदेश दिला होता. आता पुन्हा मॉर्गनला त्यांनी संदेश दिल्याने लोक शंका उपस्थित करत आहेत.

अशा पद्धतीने बाहेरून संघाला निर्देश देणे योग्य आहे का? हे तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवू शकता.

सबस्क्राईब करा

* indicates required