बापरे, मेरी कोमने ४ तासांत २ किलो वजन कसं कमी केलं ? तिला असं का करावं लागलं??

मंडळी, अवघ्या ४ तासात २ किलो वजन कमी करणं शक्य आहे का ? नक्कीच नाही. एक दोन दिवसात शक्य आहे, पण ४ तासात अवघड आहे !! पण हे शक्य करून दाखवलंय आपल्या भारताच्या मेरी कोमने. पोलंडमध्ये 13 व्या सिलेसियन ओपन बॉक्सिंग टूर्नामेंटसाठी तिने अवघ्या ४ तासात २ किलो वजन कमी केलं आणि गोल्ड जिंकून दाखवलं आहे भाऊ. 

स्रोत

झालं असं की, मेरी कोमला ४८ वजनी गटात भाग घ्यायचा होता. पण तिचं वजन ४८ किलो पेक्षा जास्त निघालं. स्पर्धेला फक्त ४ तास उरले होते.  जास्त वजनामुळे तिच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली असती. मग काय तिने ठरवलं आता 'मागे फिरायचं नाही'. तिने लगेचच वजन कमी करण्यास सुरुवात केली.

तिने कोणती शक्कल लढवली ?

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. तिच्या वजन कमी करण्याचं रहस्य आहे “दोरीवरच्या उड्या”. तिने जवळजवळ तासभर ‘दोरीवरच्या उड्या’ मारल्या आणि स्ट्रेचिंग केलं. आश्चर्य म्हणजे ही मात्रा लागू पडली. 

स्रोत

तिने अवघ्या ४ तासात फक्त वजनच कमी केलं नाही तर देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. तिने पुन्हा एकदा भारताची मान गर्वाने उंचावली आहे.

या देशाचा जिगरबाज कन्येला बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required