वर्ल्ड क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज ज्यांनी आशिया चषक स्पर्धेत केल्या आहेत सर्वाधिक धावा; पाहा टॉप -३ फलंदाज...

येत्या २७ ऑगस्ट पासून आशिया चषक २०२२ स्पर्धेला (Asia Cup 2022) प्रारंभ होणार आहे. हे या स्पर्धेचे १५ वे हंगाम असणार आहे. यापूर्वी या स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेत करण्यात येणार होते. मात्र श्रीलंका सध्या आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यात येणार आहे. टी -२० स्वरूपात असणाऱ्या या स्पर्धेत ६ संघ एकमेकांचा सामना करताना दिसून येणार आहेत. त्यामुळे चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणार यात काही शंकाच नाहीये. आज आम्ही या लेखातून तुम्हाला अशा ३ खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. (Most runs in Asia Cup)

) सनथ जयसुर्या ( Sanath jayasurya) : 

या यादीत सर्वोच्च स्थानी आहे श्रीलंका संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसुर्या आहे. आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेच्या इतिहासात कुठलाही फलंदाज सनथ जयसुर्याचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडू शकला नाहीये. त्याने आशिया चषक स्पर्धेत २५ सामने खेळले होते. यादरम्यान त्याने ५३ च्या उत्कृष्ट सरासरीने १२२० धावा केल्या होत्या. श्रीलंका संघाला आशिया चषक स्पर्धा जिंकून देण्यात सनथ जयसुर्याने मोलाची भूमिका बजावली आहे.

) कुमार संगकारा (Kumar Sangakkara) :

या यादीत दुसऱ्या स्थानी देखील श्रीलंका संघातील खेळाडूचा समावेश आहे. श्रीलंका संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. कुमार संगकाराने केलेला विक्रम देखील आजपर्यंत कोणालाही मोडता आला नाहीये. त्याने या स्पर्धेतील २३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना १०७५ धावा केल्या आहेत.

) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) :

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सचिन तेंडुलकर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकर भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. आशिया चषक स्पर्धेत देखील त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. तसेच अनेकदा त्याने महत्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने या स्पर्धेतील २३ सामन्यांमध्ये ९७१ धावा केल्या आहेत. यासह गोलंदाजी करताना १७ गडी देखील बाद केले आहेत.

काय वाटतं? कोणता भारतीय फलंदाज सनाथ जयसुर्याला मागे टाकत, सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required