या फलंदाजांनी टी -२० क्रिकेटमधील एकाच षटकात केल्या आहेत सर्वाधिक धावा, अव्वल स्थानी एकमेव भारतीय फलंदाज...

टी -२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडणं स्वाभाविक आहे. फलंदाज पहिल्या चेंडू पासूनच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडायला सुरुवात करतात. त्यामुळे टी -२० क्रिकेटला फलंदाजांचा फॉरमॅट म्हटले जाते. काही मोजकेच गोलंदाज आहेत, जे चतुर गोलंदाजी करून कमी धावा खर्च करतात. आता एकाच षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल विचारलं तर, चटकन युवराज सिंगचं नावं समोर येतं. मात्र उर्वरित दोन फलंदाज कोण आहेत हे माहितेय का? नाही ना? घ्या मग जाणून.

) युवराज सिंग (Yuvraj Singh) :

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने २००७ मध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली होती. अवघ्या १२ चेंडूंमध्ये त्याने ५० धावा ठोकल्या होत्या. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सलग ६ षटकार मारत ३६ धावा ठोकल्या होत्या. युवराज सिंगची ही ऐतिहासिक खेळी आजही स्मरणात आहे. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता. २००७ पासून हा विक्रम अजूनही अबाधित आहे.

) कायरन पोलार्ड (Kieron Pollard) :

वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज खेळाडू कायरन पोलार्ड या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. कायरन पोलार्डने देखील एकाच षटकात सलग ६ षटकार मारले आहेत. त्याने २०२१ मध्ये श्रीलंका विरुध्द झालेल्या सामन्यात अकीला धनंजयच्या षटकात सलग ६ षटकार मारले होते. कायरन पोलार्डने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. मात्र तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून आला होता.

) रायन बर्ल (Ryan burl):

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर झिम्बाब्वेचा खेळाडू रायन बर्ल आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात बर्लेने एका षटकात ३४ धावा केल्या होत्या. त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत तुफानी फटकेबाजी केली होती. त्याने बांगलादेशी गोलंदाज नसुम अहमदच्या षटकात ६,६,६,६,६,४ धावा केल्या होत्या. बर्ल इतकी तुफानी खेळी करेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. या खेळीसह तो झिम्बाब्वेसाठी एकाच षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

काय वाटतं? असा कोणता भारतीय फलंदाज आहे जो, युवराज सिंगचा विक्रम मोडून काढू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required