computer

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू !!

सचिन तेंडुलकर नंतर विक्रमांचा बादशाहा म्हणून विराट कोहली ओळखला जाईल. हे आम्ही नाही म्हणत आहोत, हे त्यानेच वेळोवेळी सिद्ध केले आहे. आहे टेस्ट असो वनडे असो की टी ट्वेन्टी, पठ्ठ्या एका मागून एक विक्रम करत पुढे चालला आहे. याला आयपीएल तरी कसे अपवाद असेल? आयपीएलच्या बहुतांश विक्रमांच्या यादीत देखील भाऊ पहिल्या क्रमांकावर आहेत.

यंदाच्या सिझनमध्ये २२ एप्रिल रोजी  झालेल्या सामन्यात त्याने एक नवा विक्रम केला. आयपीएलमध्ये आजवर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडुंच्या यादीत तो आधीही पहिला होता पण आता सर्वात आधी आणि सर्वात जास्त ६,००० धावा पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना त्याने ५१ वी धाव घेऊन त्याने या विक्रमावर आपले नाव कोरले आहे. आयपीएलमधील आपल्या १९९ सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत ६०७६ धावा केल्या आहेत. 

सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या गब्बर म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन आहे. धवनने आजवर १८३ सामन्यांमध्ये ५,५०८ धावा केल्या आहेत. यात त्याने २ शतक आणि सर्वाधिक ४३ अर्धशतक केले आहेत. या आधी दुसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना होता.  

या यादीत आता तिसरा क्रमांकावर मिस्टर आयपीएल सुरेश रैना येतो. रैनाने आजवर १९९ सामन्यांमध्ये ५,४४९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. सुरेश रैना आयपीएलमध्ये ५,००० धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला होता. 

सनरायजर्स हैदराबादचा स्फोटक बॅट्समन डेव्हिड वॉर्नर हा चौथ्या क्रमांकावर आहे. सातत्याने ऑरेंज कॅपचा विजेता ठरणारा वॉर्नर या यादीत असणे स्वाभाविक आहे. त्याने १४८ आयपीएल सामन्यांमध्ये ५,४४७ धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा ज्याप्रमाणे आपल्या कॅप्टनच्या भूमिकेने सातत्याने मुंबईला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देतो, त्याप्रमाणे तो धावा देखील खोऱ्याने ओढत असतो. त्याने २०६ सामन्यांमध्ये ५,४४५ धावा केल्या आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required