साखळी फेरीतील सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत परदेशी खेळाडूंनी मारली बाजी, पाहा संपूर्ण यादी...

येत्या रविवारी आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे. आता प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. साखळी फेरीत सर्व १० संघांचे १४ सामने पूर्ण झाले आहेत. या सामन्यांमध्ये फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस देखील पाडला आहे. आता साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज कोण आहेत? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चला तर पाहूया कोण आहेत साखळी फेरीतील सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज.

१) जोस बटलर :

राजस्थान रॉयल्स संघाचा विस्फोटक फलंदाज जोस बटलर याने या हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे. या हंगामात त्याने सुरुवातीपासूनच ऑरेंज कॅपवर ताबा मिळवला आहे. तसेच चौकार आणि षटकार मारण्याच्या बाबतीत देखील हा फलंदाज अव्वल स्थानी आहे. जोस बटलरने या हंगामातील साखळी सामन्यात एकूण ३७ षटकार मारले आहेत.

२) लियाम लिव्हिंगस्टन

इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज लियान लिव्हिंगस्टनने देखील या हंगामात तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने या हंगामात अनेकदा महत्वाची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. तसेच सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत लियान लिव्हिंगस्टन दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १४ सामन्यात ३४ षटकार मारले आहेत.

३)आंद्रे रसल

वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल हा आपल्या तुफानी फटकेबाजीमुळे ओळखला जातो. तो कुठल्याही परिस्थितीत येऊन गोलंदाजांचा घाम काढू शकतो. या हंगामात देखील त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी अनेकदा महत्वाची खेळी केली. तसेच त्याने १४ सामन्यात एकूण ३२ षटकार मारले.

) केएल राहुल

पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेचे प्रतिनिधित्व करत असलेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात केएल राहुलने मोलाची भूमिका बजावली. त्याने अप्रतिम नेतृत्वासह फलंदाजी करताना धावा देखील केल्या. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत देखील आहे. तसेच साखळी फेरीतील १४ सामन्यांमध्ये त्याने २५ षटकार मारले. 

) नितीश राणा:

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव्या हाताचा फलंदाज नितीश राणा याने या हंगामात अप्रतिम फलंदाजी केली. त्याने साखळी फेरीतील १४ सामन्यात ३६१ धावा केल्या. तसेच सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हा फलंदाज पाचव्या स्थानी आजेम नितीश राणाने १४ सामन्यात २२ षटकार मारले आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required