धोनीने राखली तिरंग्याची शान....धोनीच्या या कामगिरीने त्याचे विरोधक पण त्याला सलाम ठोकतील !!

काल भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा सामना न्यूझीलंडने जिंकला. पण खरा बाजीगर ठरला आपला महेंद्रसिंग धोनी. धोनीने आणखी एका कामगिरीतून लोकांची माने जिंकली आहेत. हा पाहा तो व्हायरल व्हिडीओ.
Proud of @msdhoni pic.twitter.com/D0ahcAJYfs
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) February 10, 2019
सामन्याच्या वेळी एक फॅन धोनीच्या पाया पडण्यासाठी धावत आला होता. त्याच्या हातात भारताचा तिरंगा होता. हा फॅन धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला तेव्हा त्याच्या हातातील तिरंगा जवळ जवळ जमिनीला स्पर्श करणारच होता की हे धोनीच्या लक्षात आलं. धोनीने प्रसंग बघून लगेचच तिरंगा उचलून घेतला आणि तिरंग्याचा अपमान होताहोता वाचला. या छोट्याश्या क्षणातून धोनीने दाखवून दिलंय की तो क्रिकेटर म्हणून तर ग्रेट आहेच पण एक माणूस म्हणूनही तो ग्रेटच आहे.
मंडळी, सामना जरी न्यूझीलंडने जिंकला असला तरी चर्चा मात्र या खास क्षणाची होत आहे. तुम्ही काय म्हणाल धोनीच्या या ऑफ दि फिल्ड कामगिरीबद्दल ?? सांगा बरं !!