computer

टोकियो ऑलम्पिक २०२१: जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा आणि यंदाच्या ऑलम्पिक मेडल्सचा काय संबंध आहे?

जगातील सर्वात जुनी स्पर्धा ऑलिम्पिक जपानमधल्या टोक्योमध्ये होऊ घातली आहे. आतापर्यंत अनेक बदल ऑलिम्पिकमध्ये करण्यात आलेले आहेत. जपानसारख्या तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या देशात ऑलिम्पिक होत आहेत म्हटल्यावर काहीतरी भन्नाट बदल पाहायला मिळणे तसे साहजिक आहे.

यावेळी पहिल्यांदा विजेत्या खेळाडूंना दिली जाणारी पदके ही रिसायकल्ड इलेक्ट्रॉनिक्सपासून तयार करण्यात आलेली आहेत. आजवर स्पर्धांमध्ये दिल्या जाणाऱ्या पदकांत सोने चांदी, तांबे अशा धातूंचा उपयोग करण्यात येत असे. ऑलिम्पिकमध्येही याच धातूंची पदके आजवर असायची.

जपानमध्ये दरवर्षी हजारो किलोचे इ-वेस्ट निघत असते. त्यांचे काहीतरी करावे या हेतूने ऑलिम्पिक कमिटी भन्नाट आयडिया घेऊन आली. २०१७ पासून त्यांनी लोकांकडून जुने स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मागविण्यास सुरुवात केली. यात ६ कोटी फोन्स समवेत तब्बल ७८ टनाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू गोळ्या करण्यात आल्या होत्या.

या इ-कचऱ्यात ७० पाऊंड सोने, ७७१६ पाऊंड चांदी तर ४८५० पाऊंड कांस्य गोळा करण्यात आले.ऑलिम्पिकमध्ये पदके बनविण्यासाठी जेवढे धातू लागतात त्यामानाने हा कच्चा माल चांगलाच गोळा झाला होता. या वर्षी पदके बनविताना त्यांचे डिजाईनसुद्धा बदलण्यात आले आहे.

अशाप्रकारे टाकाऊपासून टिकाऊचा एक मोठा प्रयोग ऑलिम्पिकने केला असून, नवी सुंदर डिझाईन आणत पदकांना आधुनिक रूपदेखील देण्यात आले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required