computer

एका सिक्सरमध्ये सामन्याचा निक्काल लावणारा शाहरुख खान !

जगातील सर्वोत्तम मॅच फिनिशर हे वाक्य वाचल्याबरोबर अनेकांच्या डोळ्यासमोर महेंद्रसिंग धोनीचा चेहरा आला असेल. पण धोनीच्या नजरेसमोर पुढचा 'मॅच फिनिशर' म्हणून एक चेहरा आहे हे सिद्ध करणारा एक फोटो सध्या वायरल होत आहे. शाहरुख खान हा तो मॅच फिनिशर आहे.

आता हा शाहरूख खान केव्हापासून क्रिकेट खेळायला लागला असे तुम्ही म्हणत असाल तर हा शाहरुख वेगळा आहे. हा क्रिकेटर शाहरुख आहे. सईद मुश्ताक अली ट्रॉफी फायनल नुकतीच पार पडली. T-20 मधील ही प्रतिष्ठेची स्पर्धा!!! यावेळी तामिळनाडूने फायनलमध्ये कर्नाटकचा पराभव केला.
 

सामना तुफान चित्तथरारक ठरला. शेवटच्या ओव्हरमध्ये तामिळनाडूला जिंकण्यासाठी १६ धावांची गरज होती. अगदी शेवटच्या बॉलवर हा सामना तमिळनाडूने जिंकला.लांबवर सिक्स मारत तमिळनाडूचा खेळाडू शाहरुख खानने आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. २०१९ साली फायनलमध्ये कर्नाटकने तामिळनाडूचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा पण या निमित्ताने निघाला.

आता हा सामना खुद्द धोनी बघत होता.शाहरूखने मारलेला विनिंग सिक्स बघत असतानाचा धोनीचा फोटो वायरल झाला आहे.धोनीच्या स्टाईलने संपवलेला सामना खुद्द धोनी बघत होता.यावरून शाहरूख खान नावाचा हा क्रिकेटपटू धोनीच्या नजरेत भरला असावा ही चर्चा सुरू झाली आहे.
 

कदाचित भविष्यात शाहरुख खानला चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळण्यासाठी विचारणा होऊ शकते असेही अंदाज लावले जात आहेत. काहीही असले तरी शाहरुख नावाच्या या पठ्ठ्याने एका सिक्सने चांगलीच हवा केली आहे. यामुळे त्याला चांगली संधी मिळू शकते. ही संधी तो कशी घेतो हे भविष्यात दिसेलच.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required