२२ वर्षीय पृथ्वी शॉने खरेदी केले २२०९ स्क्वेअर फूटचे अलिशान घर, किंमत वाचून बसेल धक्का

भारतीय संघाचा युवा विस्फोटक फलंदाज पृथ्वी शॉने मुंबईतील वांद्रे परिसरात आलिशान घर खरेदी केले आहे. वयाच्या २२ व्या वर्षी अनेक विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असतात. याच वयात पृथ्वी शॉने चक्क १०.५ कोटी रुपयांचे अलिशान घर खरेदी केले आहे. 

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, वांद्रे येथील एका पॉश सोसायटीत पृथ्वी शॉचे घर ८ व्या मजल्यावर आहे. त्याच्या घराचे कॉर्पोरेट क्षेत्र २२०९ स्क्वेअर फूट आहे. त्याच्या घरात १६५४ स्क्वेअर फूटचे टेरेस देखील आहे. पृथ्वी शॉला त्याच्या नवीन घरासह तीन कार पार्क करण्यासाठी जागा देखील मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पृथ्वी शॉने हे घर पिरॅमिड डेव्हलपर्स आणि अल्ट्रा लाईफस्पेस कडून खरेदी केले आहे. त्याने ३१ मार्च २०२२ रोजी हे घर खरेदी करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी दिली होती. तसेच २८ एप्रिल २०२२ रोजी हे घर पृथ्वी शॉच्या नावे झाले आहे.

पृथ्वी शॉ बद्दल बोलायचं झालं तर, २०१८ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तसेच अप्रतिम कामगिरी करत त्याने भारतीय संघाला जेतेपद देखील मिळवून दिले होते. याच वर्षी त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने १.५ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने ७.५ कोटी रुपये खर्च करत रिटेन केले आहे. आतापर्यंत त्याने या स्पर्धेतील ९ सामन्यात २८.७८ च्या सरासरीने २५९ धावा केल्या आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required