computer

ऑलम्पिकमध्ये मेडलसोबत खेळणी का देतात? हे आहे त्याचं कारण!!

 पी. व्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकलं:या वेळचा फोटो बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तिच्या हातात मेडलसोबत एक बाहुला पण आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूंच्या हातात पण हा बाहुला दिसत होता. एवढंच नाही तर ऑलम्पिक स्पर्धकांना पण असेच बाहुले दिले गेले होते.

तुम्हाला प्रश्न पडला का, खेळाडूंना मेडलसोबत असे बाहुले का दिले जातात? याचं उत्तर आज आम्ही सांगणार आहोत.

मंडळी, ऑलम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेच्यावेळी एकाच दिवशी अनेक स्पर्धा चालू असतात. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना त्याचवेळी मेडल दिले जात नाहीत. त्या दिवसाच्या सर्व स्पर्धा संपल्यानंतर रात्री मोठ्या समारंभाचं आयोजन केलं जातं आणि तेव्हा विजेत्या खेळाडूंना मेडल्स दिले जातात.

मंडळी, मेडल्स रात्री दिले जाणार असल्या कारणाने स्पर्धा संपल्यावर विजेत्यांना पुष्पगुच्छ देण्याची जुनी परंपरा होती. ही परंपरा २०१६ च्या रिओ ऑलम्पिकमध्ये मोडीत काढण्यात आली. पुष्पगुच्छ काही कायमचे टिकत नाहीत, परिणामी ते आठवण म्हणून जपून ठेवता येत नाहीत. गुच्छ मिळाल्यानंतर काहीवेळाने तो तिथेच फेकलाही जातो.आणि पुष्पगुच्छ म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास हा आलाच.  या सर्व कारणांमुळे ही पुष्पगुच्छाची परंपरा बाद ठरवण्यात आली. त्याची जागा घेतली छोट्या ट्रॉफीज आणि खेळण्यांनी.ऑलम्पिकपासून सुरु झालेली ही परंपरा नंतर इतर स्पर्धांमध्येही स्वीकारली गेली. त्यांनतरच्या सर्वच स्पर्धांमध्ये तुम्हाला स्पर्धकांच्या हातात ट्रॉफीज आणि खेळणी दिसतील.

साउथ कोरियात झालेल्या विंटर ऑलम्पिक २०१८ च्या स्पर्धांमध्ये साउथ कोरियन परंपरेप्रमाणे बाहुल्यात बदल करण्यात आले होते. साउथ कोरियात पांढऱ्या वाघाला महत्व आहे, त्यामुळे स्पर्धकांना पांढऱ्या वाघाची प्रतिकृती देण्यात आली होती. यात आणखी एक नाविन्य म्हणजे या वाघाच्या डोक्यावर टोपी होती आणि या टोपीवर कागदी फुलांची छोटी माळ होती.

फुलांची माळ असलेली अशी टोपी देण्याची पद्धत साउथ कोरियावर राज्य केलेल्या चोसून साम्राज्यात होती. त्याकाळी राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा पास होणाऱ्यास ही टोपी दिली जायची. चोसून साम्राज्य ५०० वर्ष (१३९२ ते १९१०) टिकलं. साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर ही पद्धत पण बंद झाली.

आता सध्या सुरु झालेली ही फुलांऐवजी बाहुला किंवा इतर वस्तू देण्याची कल्पना आम्हांला तर आवडली. तुमचं याबद्दल काय मत आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required