राहुल द्रविडचे प्रसिध्द निकनेम जॅमी अन् काय आहे १९ नंबरची जर्सी घालण्यामागचे कारण? घ्या जाणून...

भारतीय संघाची भिंत म्हटलं तर, एकच नाव समोर येतं ते म्हणजे राहुल द्रविड. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना रडवून सोडायला राहुल द्रविडला प्रचंड आवडायचं. म्हणूनच वेगवान गोलंदाजीचा बादशाह शोएब अख्तर याने देखील राहुल द्रविड याची घातक फलंदाज म्हणून निवड केली आहे. आज भारताची या भिंतीने अर्धशतक झळकावले आहे. अर्थातच ११ जानेवारी रोजी राहुल द्रविड आपला ५० वा वाढदिवस साजरा करतोय. बोभाटाच्या या लेखात आज आम्ही तुम्हाला राहुल द्रविडच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत.

हे आहे द्रविडचे टोपण नाव..

सर्वांना चांगलच माहीत आहे की, द्रविडला ग्रेट वॉल या नावाने ओळखले जाते. मात्र द्रविडला जॅमी या नावाने देखील ओळखले जाते,हे खूप कमी लोकांना माहीत आहे. यामागील कारण असं की,राहुल द्रविडचे वडील जॅम बनवणारी भारतीय कंपनी किसान कंपनीत नोकरी करायचे.त्यामुळे राहुल द्रविडची आई राहुल द्रविडला जॅमची बॉटल सोबत देत असे. त्यामुळे संघ सहकाऱ्यांनी त्याला जॅमी या नावाने हाक मारायला सुरुवात केली होती. 

क्रिकेट नव्हती पहिली आवड..

द्रविडला आपण क्रिकेटची बॅट पकडताना पाहिलं आहे. मात्र अनेकांना माहीत नसेल की, बॅट हातात घेण्यापूर्वी राहुल द्रविड हॉकी स्टिकचा वापर करायचे. कारण राहुल द्रविड हे आधी हॉकीपटू होते. राहुल द्रविडने ज्युनियर राज्य पातळीवर कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

जर्सी नंबर १९ का आहे? 

राहुल द्रविड नेहमी मैदानावर १९ नंबरची जर्सी घालून मैदानावर यायचा. मात्र १९ नंबरच का? यामागे देखील खास कारण आहे. राहुल द्रविडने सांगितले की, १९ ही राहुल द्रविडची पत्नी विजेता पेंढारकरची वाढदिवसाची तारीख आहे. त्याला ही तारीख लक्षात रहावी म्हणून त्याने आपल्या जर्सीसाठी १९ नंबरची निवड केली.

सबस्क्राईब करा

* indicates required