मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या विजयासह हिटमॅनने रचला इतिहास, गुजरात-मुंबई सामन्यात झाले हे ५ मोठे विक्रम

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेतील ५१ वा सामना मुंबई इंडियन्स ( mumbai indians) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला २० षटक अखेर ६ बाद १७७ धावा करण्यात यश आले होते. 

या धावांचा पाठलाग करत असताना गुजरात टायटन्स संघाला २० षटक अखेर ५ गडी बाद अवघ्या १७२ धावा करण्यात यश आले. हा सामना मुंबई इंडियन्स संघाने ५ धावांनी आपल्या नावावर केला. दरम्यान या सामन्यात काही विक्रम देखील बनले. चला तर पाहूया कोणते आहेत ते विक्रम.

१) मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला फलंदाजी करताना चांगली सुरुवात मिळाली होती. मुंबई इंडियन्स संघाच्या सलामीवीर फलंदाजांनी पावरप्लेच्या षटकात एकही गडी न गमावता ६३ धावा केल्या होत्या. या हंगामात ही मुंबई इंडियन्स संघाची पावरप्लेच्या षटकातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. 

२) गुजरात टायटन्स संघाविरुद्ध खेळताना पावरप्लेच्या षटकात सर्वात मोठी धावसंख्या उभी करणारा मुंबई इंडियन्स दुसराच संघ ठरला आहे. 

३) या आयपीएल स्पर्धेत राहुल तेवतियाने गुजरात टायटन्स संघाला फलंदाजी करताना अनेक महत्वाच्या सामन्यात विजय मिळवून दिला आहे. परंतु गोलंदाजीमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने आतापर्यंत ६ षटक गोलंदाजी केली आहे. ज्यात त्याने एकही गडी बाद न करता ७६ धावा खर्च केल्या आहेत. 

४) आयपीएल २०२२ स्पर्धेत आतापर्यंत तीन वेळेस सलामीवीर फलंदाजांनी डावाची सुरुवात करताना शतकी भागीदारी केली आहे. यापूर्वी ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे तसेच जोस बटलर आणि देवदत्त पडीक्कल यांच्या जोडीने हा पराक्रम केला होता.

५) तसेच हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने षटकार मारण्याच्या बाबतीत देखील दुहेरी शतक पूर्ण केले आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना २०० षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required