computer

अफगाणी निर्वासित ते जगप्रसिद्ध फुटबॉलपटू, नदिया नदीमचा जीवनप्रवास प्रेरणादायक आहे!!

तुम्ही जर महिला फुटबॉल पाहत असाल तर नादिया नदीम हे नाव तुम्हाला माहीत असेलच. युरोपच्या फुटबॉल जगतातील सुपरस्टार असलेली नादिया नदीम खऱ्या अर्थाने रोल मॉडेल ठरावी अशी आहे.

मध्यंतरी तिने पीएसजीसोबत फ्रेंच लीग टायटल जिंकले आणि नुकतेच रेसिंग लुईसविले फुटबॉल क्लब जॉईन केला आहे. नादियाच्या नावावर जवळपास २०० गोल्स आहेत. अवघ्या ३३ वर्षांच्या वयात तिने मारलेली भरारी डोळ्यात भरणारी आहे.

नादियाचा भूतकाळ जाणून घेतला तर तिचे आजचे यश का महत्वाचे आहे याचा अंदाज येऊ शकतो. नादियाचा जन्म अफगाणिस्तानला झाला. तिचे वडील अफगाण आर्मीत जनरल होते. तालिबानकडून त्यांची हत्या करण्यात आली. अशा परिस्थितीत ती आपल्या कुटुंबासोबत डेन्मार्कला गेली. डेन्मार्कला गेल्यावर तिने हळूहळू आपले फुटबॉल खेळणे सुरू केले. आधी ती B52 अलबोर्ग आणि विबोर्ग संघासोबत खेळत होती. पुढे ती स्काय ब्ल्यू फुटबॉल क्लबकडून खेळायला लागली. यानंतर मोठ्या पीएसजी क्लबसोबत ती जोडली गेली.

२००९ येता-येता ती डेन्मार्ककडून खेळायला लागली होती. २०१८ ला तर ती मँचेस्टरकडून देखील खेळली. डेन्मार्ककडून ती आजवर ९८ सामने खेळली आहे. डेन्मार्ककडून १०० सामने खेळण्याची तिची इच्छा यंदा पूर्ण होईल.

वयाच्या १२ व्या वर्षी पूर्ण आयुष्य उध्वस्त झालेली एक मुलगी स्थलांतरित होऊन दुसऱ्या देशात जाते आणि तिथे जाऊन त्या देशातील फुटबॉलमधील प्रमुख खेळाडू होते हा प्रवास खचितच सोपा नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required