computer

भारत-पाकिस्तान T20मॅचमध्ये भारत कधीच न हरण्याचं सेहवागने काय गुपित सांगितलं आहे?

भारत-पाकिस्तान एकमेकांविरुद्ध क्रिकेट मालिका खेळत नसले तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन्ही देश समोर आल्यावर जो माहोल तयार होतो तो जबरदस्त असतो. भारत जिंकल्यावर पाकिस्तानात फुटणाऱ्या टिव्ह्या बघण्यासारखा दुसरा आनंद नाही. आता यातला गंमतीचा भाग सोडा. पण भारतीय खेळाडूही आनंद आपल्याला देण्यात कधी कमी पडत नाहीत.

आजवर टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये भारताने नेहमीच विजय मिळवला आहे. वनडेमध्येही हा विक्रम ७-० असा आहे. अपवाद फक्त २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा. त्यात भारत पाकिस्तानकडून पराभूत झाला होता

यावेळी टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून कधी न हरण्याचा भारताचा विक्रम मोडायचाच असा चंग पाकिस्तानने बांधला आहे. तसे दावेही त्यांच्याकडून केले जात आहेत. मात्र यात भारताचा माजी स्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने भारत नेहमी का जिंकतो याचे 'सिक्रेट' सांगितले आहे.

सेहवाग सांगतो, "आम्ही दरवेळी पूर्ण तयारीनिशी उतरतो, आमची पोझिशन चांगली असल्याने आमच्यावर दबाव कमी असतो. त्यात पुरेशी तयारी असल्याने जिंकण्याचा आत्मविश्वास असतो. उलट पाकिस्तानी संघ फक्त जिंकण्याच्या गोष्टी करत असतो. भारत अशा गोष्टी बोलण्याऐवजी तयारी भक्कम असण्यावर भर देतो."

सेहवाग असेही नमूद करतो की, "टी-ट्वेन्टीमध्ये एखादा खेळाडूही सामना फिरवू शकतो. पाकिस्तानकडे अनेक मॅच विनर्स आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तान जिंकण्याचे पण चान्सेस आहेत. आजवर जरी असे झाले नाही तरी पुढे काय होईल हे सांगता येत नाही."

आता सर्वांच्या नजरा या २४ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावर खिळल्या आहेत. या सामन्यात कोण बाजी मारतो याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required