यंदाची फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धा आहे जरा हटके!!आधुनिक तंत्रज्ञानाचा केला जातोय वापर..

सध्या कतारमध्ये फिफा विश्वचषक २०२२ (FIFA World Cup 2022) स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा आतापर्यंत खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेपेक्षा जरा वेगळी असणार आहे. ही स्पर्धा वेगळी असण्याचं मुख्य कारण म्हणजे या स्पर्धेत वापरलं गेलेलं तंत्रज्ञान. यापूर्वी या स्पर्धेचं आयोजन उन्हाळ्यात केलं जायचं . मात्र यंदा ही स्पर्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पार पडत आहे. कतारलामध्ये सुरु असेलेली ही स्पर्धा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील अतिशय खास आहे. कारण या स्पर्धेत असे अनेक तंत्र वापरले जात आहेत जे यापूर्वी कधीही वापरले गेले नव्हते.

स्मार्ट बॉलचा केला जाणार वापर... 

या विश्वचषक स्पर्धेत सामान्य  फुटबॉलचा वापर केला जाणार नाहीये. तर या स्पर्धेत अल-रिहला नावाच्या   फुटबॉलचा वापर केला जाणार आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, या फुटबॉलमध्ये असं काय वेगळं असणार आहे? तर हा  फुटबॉल एडिडास कंपनी बनवणार आहे. ज्यामुळे व्हीएआर सिस्टमला( व्हर्च्युअल रेफ्री टेक्नॉलॉजी) मोठी मदत होणार आहे. या चेंडूच्या आत एक सस्पेन्शन सिस्टम फिट करण्यात आले आहे. ज्यामुळे डेटा अवघ्या काही सेकंदात कंट्रोल रूमला पाठवता येणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चेंडू जेव्हा ऑफ साईड जातो त्यावेळी, निर्णय घेणं कठीण होऊन जातं.मात्र या चेंडूमुळे आता निर्णय घेणं सोपं  होणार आहे. 

खेळाडूंसाठी खास ऍप.. 

फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत खेळाडू कसे खेळत आहेत याची माहिती खेळाडूंना सामना सुरु असतानाच मिळणार आहे. सर्व  संघातील खेळाडूंना ऑन-फिल्ड ऍक्सेस ऍप दिले जाणार आहे. या ऍपमुळे खेळाडूंना हवी ती सर्व माहिती मिळणार आहे.  या ऍपवर खेळाडूंची चेंडूची स्थिती, त्यांचा वेग, प्रतिस्पर्ध्यावरील दबाव, चेंडूचा ताबा अशी माहिती खेळाडूंना मिळणार आहे. 

स्टेडियम थंड ठेवण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर... 

कतारमधील वातावरण हे खेळाडूंसाठी मोठं आव्हान असणार आहे. या स्पर्धेचे आयोजन नोव्हेंबरमध्ये करण्यात येत असले तरीदेखील, कतारमध्ये वातावरण गरम असतं. त्यामुळे स्टेडियम थंड ठेवण्यासाठी एका खास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कतारचे प्रोफेसर सौद अब्दुलअजीज अब्दुल गनी,जे डॉक्टर कूल म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी स्टेडियममधील उष्णता कमी करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. स्टेडियममध्ये मोठमोठे पाईप्स लावण्यात आले असून, त्यांच्या मदतीने स्टेडियममध्ये एक प्रकारचा बुडबुडा तयार केला जाईल जेणेकरून प्रेक्षकांना उष्णता जाणवणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required