विराट कोहलीच्या शतकानंतर या ३ दिग्गजांची बोलती झाली बंद! एकाने तर संघाबाहेर करण्याचा दिला होता सल्ला..

विराट कोहलीला आता निरोप देण्याची वेळ आहे. विराट कोहली फॉर्ममध्ये नाहीये तर त्याला आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी स्थान देऊ नका. जेव्हा विराट कोहली धावा करण्यात अपयशी ठरत होता त्यावेळी अनेक दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीवर बोचरी टीका करत होते. त्यामुळे विराट कोहलीवर दबाव वाढत चालला होता. मात्र विराट कोहलीने आपल्या बॅटने जोरदार प्रत्युत्तर देत टीका करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. आता १०२० दिवसांनंतर विराट कोहलीने ज्या टीका करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे ते दिग्गज क्रिकेटपटू आहेत तरी कोण? चला जाणून घेऊया.

कपिल देव (Kapil dev) :

भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. कपिल देव यांचे म्हणणे होते की, कसोटी संघातून जर आर अश्विन बाहेर होऊ शकतो तर विराट कोहली का नाही? कपिल यांनी म्हटले होते की, "आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, विराट कोहलीला बाहेर बसावे लागू शकते. जर दुसऱ्या क्रमांकांचा गोलंदाज बाहेर बसू शकतो तर पहिल्या क्रमांकाचा फलंदाज देखील बाहेर बसू शकतो." मात्र विराट कोहलीची खेळी पाहता आता कपिल देव असे वक्तव्य करणार नाही.

राशिद लतिफ (Rashid Latif)

नुकताच पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू राशिद लतिफने विराट कोहलीवर जोरदार टीका केली होती. एका शो मध्ये राशिद लतिफने म्हटले होते की, "विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटचा महान फलंदाज आहे पण तो कधीही टी-२० मध्ये चांगला फलंदाज ठरला नाहीये. विराट कोहलीला फटकेबाजी करण्यापूर्वी ३०-३५ चेंडू खेळावे लागतात. तो कधीच सूर्यकुमार यादव किंवा रोहित शर्मासारखा फलंदाज बनू शकत नाही. त्यामुळेच त्याचा संघ आरसीबी आयपीएल जिंकू शकला नाही." कदाचित विराटच्या शतकानंतर त्याचे तोंड बंद झाले असेल.

इरफान पठाण (Irfan Pathan

इरफान पठाणचे म्हणणे होते की, विराट कोहली जर फॉर्ममध्ये नसेल तर त्याला टी -२० विश्वचषक स्पर्धेत संधी नाही मिळाली पाहिजे. त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, "विराट कोहली आणि केएल राहुल फॉर्मच्या शोधात आहेत पण जर ते अपयशी ठरले तर संघ व्यवस्थापकांना अशा खेळाडूंची निवड करावी लागेल जे संघासाठी चांगली कामगिरी करू शकतील. कारण टी -२० विश्वचषक हे फॉर्म मिळविण्याचे व्यासपीठ नाही." आता कदाचित इरफान पठाण दुसरा खेळाडू शोधण्याबाबत बोलणार नाही.

काय वाटतं,विराट कोहली आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required