देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्टार असलेल्या 'या' खेळाडूंवर निवडकर्त्यांनी नेहमी केलंय दुर्लक्ष!! पाहा टॉप ३ खेळाडूंची यादी..

भारतीय संघासाठी (Indian team) खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते. मात्र खूप कमी खेळाडूंचे स्वप्न पूर्ण होते. तर काही खेळाडू असे देखील आहेत जे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत, मात्र त्यांना भारतीय संघात स्थान मिळवता येत नाहीये. आज या लेखातून आम्ही तुम्हाला अशा ५ भारतीय खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून प्रकाशझोतात आले, मात्र भारतीय संघासाठी पदार्पण करण्यास अपायशी ठरले. 

) प्रियांक पांचाळ ( Priyank panchal) :

उजव्या हाताचा फलंदाज प्रियांक पांचाळ (Priyank panchal) याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या ३२ वर्षीय फलंदाजाने आतापर्यंत प्रथम श्रेणीमध्ये एकूण १०१ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ४५.३ च्या सरासरीने ७०६८ धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमधील ७५ सामन्यांमध्ये २८.२ च्या २८५४ धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतकी चांगली कामगिरी करून सुद्धा तो निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यास अपयशी ठरत आहे. त्याला भारतीय संघात स्थान मिळाले होते, मात्र त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाहीये.

) अभिमन्यू ईश्वरन ( Abhimanyu ishwaran) :

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अभिमन्यू ईश्वरनने देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७२ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ४३.३ च्या सरासरीने ५०१९ धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमधील ७१ सामन्यांमध्ये त्याने ४६.९ च्या सरासरीने ३१४३ धावा केल्या आहेत. इतकी चांगली कामगिरी करूनही या २६ वर्षीय खेळाडूला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाहीये.

) जलज सक्सेना (jalaj saxena) :

जलज सक्सेनाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेत त्याची आयपीएल स्पर्धेसाठी निवड झाली होती. मात्र त्याला आयपीएल स्पर्धेत जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. २०२१ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने एका सामन्यात गोलंदाजी करताना ३ षटकात २७ धावा खर्च करत १ गडी बाद केला होता. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ११९ सामन्यांमध्ये त्याने ३७.०१ च्या सरासरीने ६२५६ धावा केल्या आहेत. यासह ३२६ गडी देखील बाद केले आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमधील ९३ सामन्यांमध्ये त्याने २५.८० च्या सरासरीने १८८४ धावा केल्या आहेत. यासह गोलंदाजी करताना त्याने १०८ गडी देखील बाद केले आहेत. चमकदार कामगिरी करूनही तो भारतीय संघात स्थान मिळवण्यास अपयशी ठरला आहे.

काय वाटतं? या खेळाडूंची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पाहता, या खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिले गेले पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required