या ३ कारणांमुळे तुटलं भारतीय संघाचं १५ वर्षानंतर मालिका जिंकण्याचं स्वप्न..

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. आता क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हणतात, याचं ताजं उदाहरण पाहायचं असेल तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील (India vs England)  पाचवा कसोटी सामना आवर्जून पाहा. सामन्यातील पहिला, दुसरा आणि तिसरा दिवस हा भारतीय संघाच्या दिशेने राहिला. भारतीय खेळाडूंनी आणि चाहत्यांनी विजयाचा जल्लोष साजरा करायला सुरुवात केली होती. मात्र चौथ्या आणि पाचव्या दिवशी इंग्लिश खेळाडूंनी भारतीय संघाचे विजय मिळवण्याचे स्वप्न मोडून काढले. नेमकं असं काय घडलं? ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. चला तर पाहूया भारतीय संघाच्या पराभवाची ३ प्रमुख कारणं. 

) भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो:

बर्मिंगहॅमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी फायदेशीर होती. मात्र भारतीय संघातील असे ४ फलंदाज होते जे या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरले. सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने (Shubman gill) पहिल्या डावात १७ तर दुसऱ्या डावात ४ धावा केल्या. हनुमा विहारीने (Hanuma vihari)  २० आणि ११ धावांची खेळी केली. विराट कोहलीने (Virat Kohli) केवळ ११ आणि २० धावा केल्या. तर श्रेयस अय्यरला (Shreyas iyar) केवळ १५ आणि १९ धावांची खेळी करता आली. जर संघातील टॉप ६ फलंदाज अशी निराशाजनक कामगिरी करतील तर कसोटी सामन्यात विजय मिळवणं खूप दूरची गोष्ट आहे. मात्र रिषभ पंत (Rishabh pant) आणि रवींद्र जडेजाने (Ravindra jadeja) अप्रतिम फलंदाजी केली. दोघांनी शतक झळकावले तर चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar pujara) देखील भारतीय संघासाठी महत्वपूर्ण धावा केल्या.

) खराब क्षेत्ररक्षण/ क्षेत्ररक्षण करताना चुकीची रणनिती :

 इंग्लंड संघासाठी जॉनी बेअरस्टो सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. दोन्ही डावात या फलंदाजाने शतक झळकावले. याच फलंदाजाला दोन वेळेस जीवदान मिळाले. जेव्हा तो १४ धावांवर फलंदाजी करत होता त्यावेळी हनुमा विहारीने त्याचा झेल सोडला. त्यानंतर ३९ धावांवर फलंदाजी करत असताना रिषभ पंतने झेल सोडत त्याला पुन्हा एकदा जीवदान दिले. तसेच क्षेत्ररक्षण सजवण्याच्या बाबतीत देखील भारतीय संघ कुठेतरी मागे राहिला. चेतेश्वर पुजारा हा भारतीय संघाचा स्लीप स्पेशलिस्ट आहे. मात्र त्याच्या बोटाला दुखापत झाल्याने हनुमा विहारीला स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करावे लागले. तसेच शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर सारखे खेळाडू संघात असताना हनुमा विहारीला स्लीपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी ठेवणं कुठेतरी चुकीचा निर्णय होता.

३) आर अश्विनला संघाबाहेर ठेवणं :

सध्या आर अश्विन (R Ashwin) हा भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे. इंग्लिश फलंदाज हे फिरकी गोलंदाजांविरुद्ध टिकून फलंदाजी करू शकत नाही. ते फिरकीच्या जाळ्यात लवकर अडकतात. तरीदेखील संघातील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजाला संघाबाहेर ठेवण्यात आले. हेच कारण होते की, इंग्लिश फलंदाजांनी दुसऱ्या डावात धावांचा यशस्वी पाठलाग केला.

काय वाटतं? भारतीय संघाच्या पराभवाचं प्रमुख कारण काय? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required